Shinde Fadnavis Government : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालंय. यानिमित्ताने सरकारकडून जोरदार जाहिरातबाजी करण्यात आलीये. वर्षभराच्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांना लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या जाहिरातीमध्ये एक चूक लोकांनी समोर आणलीये. सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना जाहीर केली, आता त्याबद्दल केलेल्या दाव्यावरून प्रश्न उपस्थित केला गेला आहे. (Shinde Fadnavis government completed one year on june, 30 )
ADVERTISEMENT
‘हे राज्य व्हावे सुराज्य ही जनतेची इच्छा’, या मथळ्याखाली शिंदे सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीत सरकारने वर्षभर केलेल्या घोषणा आणि घेतलेल्या निर्णयांवर प्रकाशझोत टाकला आहे. यात एक निर्णय आहे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा.
सरकारचा दावा काय?
सरकारने जाहिरातीत दावा केला आहे की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्ष पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत. आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये ज्येष्ठांना लाभ.”
हेही वाचा >> Senthil Balaji : राज्यपाल मंत्र्याची हकालपट्टी करू शकतात, कायदा काय सांगतो?
हीच जाहिरात पोस्ट करत दिलीप डिसुझा नावाच्या व्यक्तीने एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात की, “महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 13 कोटी आहे. आज मला कळलं की त्यापैकी 10 कोटी लोकं म्हणजे 77 टक्के लोकसंख्या ज्येष्ठ प्रवासी आहेत.”
अॅड. एम या नावाने असलेल्या ट्विट हॅण्डलवरून तर थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आलीये. “स्वतःचे पैसे खर्च करून वाट्टेल ते भ्रामक छापा. आमचा पैसा का वाया घालवतात?”, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
जाहिरातीत चुकलं काय?
सरकारकडून देण्यात आलेली जाहिरात इंग्रजीमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठी जाहिरातीत सरकारने आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये ज्येष्ठांना लाभ मिळाल्याचा दावा केलाय, पण इंग्रजीमध्ये मात्र वेगळं म्हटलं आहे. इंग्रजी जाहिरातीत 10 कोटी ज्येष्ठ प्रवाशांना याचा लाभ मिळाला असल्याचा दावा केला गेला आहे. इंग्रजी जाहिरात पोस्ट करतच महाराष्ट्रात इतके ज्येष्ठ नागरिक आहेत का? असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
हेही वाचा >> ‘मोदी-शाहांच्या इशाऱ्यावर शिंदेंनी कोंबडी कापून खाण्याचे ठरवलंय’, BMC मोर्चा आधी ‘सामना’तून हल्ला
2011 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसख्या 11.24 कोटी इतकी होती. त्यानंतर सार्वत्रिक जणगणना झालेली नाही. मात्र, विविध रिपोर्टमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या (2023) जवळपास 13.16 कोटी इतकी असल्याचे म्हटले गेलेले आहे.
ADVERTISEMENT