Maharashtra Government : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बुधवारी (6 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार विखे पाटील यांनी कांदा अनुदान वितरणाचा ऑनलाइन शुभारंभ केला.
पहिल्या टप्प्यात 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ
कांदा अनुदानासाठी 10 कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार आहे.
Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?
दहा कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार पर्यंत सर्वांना अनुदान वितरित केले जाणार आहे.
INDIA Vs Bharat : ‘भाजप जिन्नांच्याच विचाराची री ओढतेय’, शशी थरुरांनी सांगितला इतिहास
दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या या 10 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची 10 हजार पर्यंतची देयक आहेत, त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. आणि ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक 10 हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान वितरित होणार आहे.
ADVERTISEMENT