Pune plane Accident : पुणे जिल्ह्यातील बारामतीत वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे विमान कोसळले आहे. यात एक पायलट प्रशिक्षक आणि शिकाऊ पायलट असं दोघे जखमी झाले आहेत. दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीही याच संस्थेचे विमान कोसळले होते.
ADVERTISEMENT
बारामती विमानतळाजवळ दोन पायलट प्रशिक्षण संस्था आहेत. या एक आहे बारामती रेडबर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्था. मागील चार दिवसांत या संस्थेचे सलग दोन विमानं दुर्घटनाग्रस्त झाली आहेत.
बारामतीत कुठे कोसळलं विमान?
रविवारी (22 ऑक्टोबर) सकाळी रेडबर्ड ट्रेनिंग सेंटरच्या विमानाला ट्रेनिंग सुरू असताना अपघात झाला. ही घटना बारामती तालुक्यातील गादीखेळ परिसरात घडली.
हेही वाचा >> Beed : मराठा आरक्षणासाठी आयुष्यच संपवलं! बीडमध्ये घरातच घेतला गळफास
रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचं VT-RBT विमान तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळलं. यात एक पायलट ट्रेनर आणि एक ट्रेनी पायलट असे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा >> Gadchiroli: कुंभारे कुटुंबाला सुनेने ‘या’ विषाचा भरवला घास, ‘यासाठी’ काढला काटा!
दोन दिवसांपूर्वीच या ट्रेनिंग सेंटरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. दोन्ही विमान दुर्घटना लॅंडिंग वेळीच घडल्या आहेत. या घटनांवर रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT