UPSC Result Out: UPSC निकाल जाहीर, पाहा संपूर्ण टॉपर्सची यादी

मुंबई तक

• 06:04 PM • 16 Apr 2024

UPSC Civil Service Result Out: UPSC मुख्य 2023 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. आदित्य श्रीवास्तवने 2023 च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक वन मिळवले आहे. येथे तुम्ही संपूर्ण टॉपर यादी तपासू शकता.

Mumbaitak
follow google news

UPSC CSE 2023 Result Out: नवी दिल्ली: UPSC CSE निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आज संपली आहे. UPSC मुख्य 2023 चा अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. ज्यामध्ये आदित्य श्रीवास्तव याने अवघ्या देशातून पहिला क्रमांक मिळवला आहे. याशिवाय अनिमेश प्रधान दुसऱ्या तर डोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. येथे तुम्ही संपूर्ण टॉपर यादी पाहू शकता. (upsc main result 2023 declared check complete list of toppers)

हे वाचलं का?

UPSC ऑल इंडिया रँकचे पाच टॉपर्स कोण आहेत?

UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 च्या निकालात, आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक वन मिळवला आहे आणि अनिमेश प्रधानला दुसरा क्रमांक मिळाला आहे आणि अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे, पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या स्थानावर आहे तर रुहानी पाचव्या स्थानावर आहे.

असा पाहा UPSC चा अंतिम निकाल

स्टेप 1: प्रथम अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in वर जा.
स्टेप 2: तुम्हाला वेबसाइटच्या होमपेजवर निकालाची लिंक दिसेल.
स्टेप 3: निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: तुमच्या समोर एक PDF उघडेल.
स्टेप 5: तुमचा रोल नंबर PDF मध्ये शोधा.
स्टेप 6: पीडीएफ डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

टॉपर्सची संपूर्ण यादी येथे पहा

PDF पाहा

पाहा किती उमेदवार कोणत्या श्रेणीतून निवडले

निवड झालेल्या 1016 उमेदवारांपैकी 347 सामान्य श्रेणीतील आहेत. 115  EWS वर्गातील आहेत तर 303 OBC उमेदवार आहेत. 165 SC आणि 86 ST उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट A आणि B मध्ये नियुक्तीसाठी लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणीच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात आले आहेत.

    follow whatsapp