लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य: नरेंद्र मोदी

मुंबई तक

13 Jul 2024 (अपडेटेड: 13 Jul 2024, 06:31 PM)

Maharashtra Weather Forecast : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौरा अपडेट्स, विधान परिषद निवडणूक २०२४ घडामोडी, महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स वाचा...

PM Narendra modi, mumbai tour

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

follow google news

Maharashtra Breaking news Updates : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे महायुतीने पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत दणदणीत यश संपादन केल्याने तिन्ही पक्षाचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांचीही चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने काँग्रेसमधील नेते संतापले असून, महायुतीला मतदान करणारे ते आमदार कोण, आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार, याबद्दल दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात.. त्यासंदर्भातील अपडेट्स इथे वाचा...

महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची संततधार कायम आहे. हवामान विभागाने पुढील तीन चार दिवसांसाठी काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हवामानाचे ताजे अपडेट्सबद्दल वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:01 PM • 13 Jul 2024
    PM नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दाखल झाले आहे.  नरेंद्र मोदी यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामांचं भूमिपूजन करणार आहेत. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
     

  • 12:01 PM • 13 Jul 2024
    Vidhan Parishad Election Updates : अजित पवारांचा शरद पवारांना धक्का!

    विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटू शकतात, अशी चर्चा सुरूवातीपासूनच रंगली होती. अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान करू शकतात असेही म्हटले गेले. 

    विधान परिषदेचे निकाल समोर आल्यानंतर ही चर्चा निराधार ठरली. एकाही आमदाराचे मत फुटू न देता अजित पवारांनी दोन्ही उमेदवार निवडून आणत शरद पवारांना धक्का दिला. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीच मते खेचून आणत अजित पवारांनी दोन्ही उमेदवार निवडून आणल्याची चर्चा निकालानंतर रंगली.

     

     

  • 09:14 AM • 13 Jul 2024
    Raigad fort News : महादरवाजाजवळ दरड कोसळली! 

    किल्ले रायगडावर महादरवाजाच्या अलिकडच्या भागामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. 

    जिल्हा प्रशासनाने आधीच पायरी मार्गावरून किल्ल्यावर जाण्यास बंदी केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

    स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, महादरवाजाच्या अलिकडील सपाटीकरण असलेल्या भागामध्ये ही दरड कोसळली आहे.

    ही दरड कोसळून रस्ता बंद झालेला आहे. ही दरड हटवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बुर्ले यांनी सांगितले.

    चार दिवस रायगड जिल्ह्यात संततधार पावसाची शक्यता असून, वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. त्यामुळे किल्ल्याचा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

  • 09:04 AM • 13 Jul 2024
    PM Modi in Mumbai Updates : मोदी आज मोठ्या प्रकल्पांचे करणार भूमिपूजन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात मोदी काही प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत. त्याचबरोबर सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. 

    - 16600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन
    - 6300 कोटी रुपयांच्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातंर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन
    - 5540 कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ
    - 813 कोटी रुपयांच्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी 
    - 52 कोटी रुपयांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चे राष्ट्रार्पण
    - 64 कोटी रुपयांतून तयार करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
    - 27 कोटी रुपयांच्या तुर्भे येथील गति शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी

follow whatsapp