Pune Crime Latest News Update : पुण्यातील वाकडमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. प्रियकराने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या हत्येच्या घटनेप्रकरणी आरोपी दिनेश ठोंबरेला वाकड पोलिसांनी अटक केलीय. या हत्येमागे दिनेशची पत्नी आणि मेहुण्याचाही हात असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालीय. त्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश आणि त्याची प्रेयसी जयश्री मागील पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांना अडीच वर्षाचा मुलगा आहे. जयश्रीला वेगळं राहायचं होतं. त्यासाठी जयश्री मागील काही दिवसांपासून दिनेशकडे पैशांची मागणी करत होती. मागील आठवड्यात रविवारी रात्री 9 वाजता दिनेशची पत्नी पल्लवी आणि जयश्रीची भूमकर चौकात भेट झाली. त्याचदरम्यान जयश्री आणि दिनेश यांच्यात बाचाबाची झाली. दोघांमध्ये वादाची ठिणगी उडाल्याने संतापलेल्या दिनेशने जयश्रीच्या डोक्यावर हातोडा मारून तिचा खून केला.
हे ही वाचा >> Uday Samant: "60 आमदारांनी मिळून..."; एकनाथ शिंदे गावी जाताच उदय सामंतांचं मोठं विधान!
त्यानंतर दिनेशची पत्नी पल्लवीने मृतदेह फेकून देण्यासाठी तिचा भाई अविनाश टिलेची मदत घेतली. त्यानंतर तिघेही कारमध्ये मृतदेह घेऊन साताऱ्याच्या खंबाटकी घाटात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. या तिघांनीही जयश्रीचा मृतदेह तिच्या मुलासमोर फेकून दिला. त्यानंतर तिघांनी जयश्रीच्या मुलाला 25 नोव्हेंबरला आळंदीच्या कार्तिक यात्रेत सोडून दिलं. पोलिसांना जयश्रीचा मुलगा शीव सापडताच या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी या आरोपींना अटक केली.
हे ही वाचा >> Optical Illusion Test: स्वत:ला हुशार समजता? मग चिंटूच्या गर्दीत लपलेला 'पिंटू' शोधून दाखवा
ADVERTISEMENT