-प्रवीण ठाकरे, नाशिक
ADVERTISEMENT
Sudhakar Badgujar News in Marathi : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे व्हिडीओच विधानसभा अध्यक्षांकडे दिला. बडगुजर हे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करत आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला असून, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी करण्याची घोषणा केली. यामुळे सुधाकर बडगुजर चर्चेत आले आहेत. जाणून घ्या त्यांच्याबद्दल…
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द 2007 पासून सुरू झाली. त्याआधी त्यांची बडगुजर आणि कंपनी ही ठेकेदारी फर्म होती. त्यांनी जवळपास 6 वर्षे नाशिक महापालिका आणि पंचायत समितीमध्ये ठेकेदार म्हणून काम केले. नंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले.
हेही वाचा >> Manoj Jarange : “…ते मराठा आरक्षण टिकणार नाही”, जरांगेंचं मोठं विधान
2007 मध्ये सुधाकर बडगुजर नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.
हेही वाचा >> “फडणवीसांचा वापर, अजित पवारांना संपवायचं”, भुजबळांबद्दल खळबळजनक विधान
तेव्हा अपक्ष नगरसेवकांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. त्यानंतरच बडगुजर यांना राजकीय पक्षाचे दरवाजे उघडे झाले. त्यावेळी बडगुजर हे नाशिकमधील आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जायचे. मुळात ठेकेदार असल्याने त्यांना कामकाजाची पद्धत माहिती होती, त्याचा फायदा त्यांना मिळला.
नाशिक महापालिकेत सभागृह नेते
पुढे बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले.
नाशिकच्या पूर्वीच्या सिडको आताच्या नवीन नाशिक भागात पवन नगर व सावता नगर भागात ते नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा तर बडगुजर यांच्यासह त्यांची पत्नीही निवडून आली होती. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर हे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते.
2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 15 वर्ष ते ते नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक राहिले आहेत.
नारायण राणे प्रकरणामुळे आले होते चर्चेत
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याच प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार केल्याने शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अचानक प्रकाशझोतात आले होते.
सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असल्याचे म्हटले जाते. सुधाकर बडगुजर हे सध्या शिवसेनेचे (उबाठा) महानगरप्रमुख आहेत.
ADVERTISEMENT