Girl Propose: ‘या’ 5 कारणांमुळे मुली प्रपोज करणे टाळतात….

प्रशांत गोमाणे

23 Aug 2023 (अपडेटेड: 23 Aug 2023, 01:01 PM)

मुली आपल्या आवडत्या तरूणाला प्रपोज का करत नाही? मुली प्रपोज करणे का टाळतात? असा अनेक प्रश्न तरूणांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आता जाणून घेऊयात.

why always men propose women cannot know the reason full story

why always men propose women cannot know the reason full story

follow google news

लव्हस्टोरी म्हटली तर प्रपोज आलचं, आणि अनेक नात्यात मुलचं मुलींना प्रपोज करत असतात. असे अनेक लव्हस्टोरीमधून दिसून आले आहे. अशा अवस्थेत मुली आपल्या आवडत्या तरूणाला प्रपोज का करत नाही? मुली प्रपोज करणे का टाळतात? असा अनेक प्रश्न तरूणांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आता जाणून घेऊयात.(why always men propose women cannot know the reason full story)

हे वाचलं का?

सध्याच्या या धावपळीच्या युगात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून करिअरच्या पायऱ्या चढत आहे. मुलांपेक्षाही अनेक क्षेत्रात यश संपादन करत आहे. एकूणचा मुली मुलांच्या तुलनेत कुठेच मागे राहत नाही आहे. मात्र मुलांना प्रपोज करण्यात मुली माघार घेताताय.यामागे 5 प्रमुख कारणे आहेत, ही कारणे काय आहेत, ते जाणून घेऊयात.

…म्हणून प्रपोज टाळतात

एका अभ्यासानुसार मुलांपेक्षा मुलींना डेटसाठी जास्त विचारले जाते. प्रपोज करण्याच्या बाबतीत देखील हेच समीकरण आहे. या कारणामुळे मुलींमध्ये मुलांनीच प्रपोज केले पाहिजे असा समज निर्माण होतो. तसेच काही मुली याकडे प्राधान्य म्हणून पाहतात आणि तरूणांना प्रपोज करत नाही.

रिजेक्शनची भीती

तरूणींना प्रेमात सर्वाधिक भीती ही रिजेक्शनची वाटते. आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम केलं आणि त्याने नाही म्हटलं तर, ही भीती तरूणींना सतावते. तसेच तरूणाच्या नकारामुळे तरूणींवर मोठा आघात होण्याची शक्यता असते. यामधून त्यांना बाहेर येण्यासही खूप वेळ लागतो. म्हणूनच तरूणी प्रपोज करणे टाळतात.

हे ही वाचा : Goa Crime news : तरुणीसह तिच्या मित्राला बेदम मारहाण; घटनेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

ब्रेकअप

अनेक तरूणी या तरूणांना प्रपोज करणे टाळतात. यामागचे कारण म्हणजे, अनेक तरूणींना असे वाटते की, तरूण नात्याबद्दल गंभीर नसतात आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना सोडण्याची धमकी देतात. अनेक नात्यात ही उदाहरणे पाहायला मिळतात, ‘तू मला प्रपोज केले आहेस, मी तुझ्याकडे आलो नव्हतो’,याच कारणामुळे तरूणी तरूणांना प्रपोज करत नाही.

बोल्ड टॅग मिळतो

ज्या मुली त्याच्या आवडीच्या तरूणाला प्रपोज करतात त्यांना एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. अशा प्रकरणात मुलींना अशी वागणूक दिली जाते की, जणू त्यांनी कोणता गुन्हाच केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये सुरु असलेली अशी कुजबुज तरूणींनी आवडत नाही, त्यामुळेच त्या प्रपोज न करता, इशारो इशारोमध्ये तरूणांवर प्रेम व्यक्त करत असतात.

दुषणे देतात

आतापर्यंत तरी तरूणच तरूणींना प्रपोज करतात. एखाद्या तरूणाने कोणत्याही पद्धतीने तरूणीला प्रपोज केले तर त्याला रोमँटीक टॅग दिला जातो. पण असेच जर एखाद्या तरूणीने केले तर तिला नावे ठेवली जातात. तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित केला जातो. या कारणामुळे देखील तरूणी आपल्या फिलींग तरूणांसमोर व्यक्त करत नाही.

    follow whatsapp