ॲमेझॉनमध्ये सापडला महाकाय Green Anaconda, व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

22 Feb 2024 (अपडेटेड: 22 Feb 2024, 05:35 PM)

ग्रीन ॲनाकोंडा हा जगातील सगळ्यात मोठा साप आहे. त्याचबरोबर जगातील सगळ्यात लांब सापामध्येही त्याची गणना केली जाणार आहे. ज्या सापाचा शोध लावण्यात आला आहे, त्याची लांबी 25 फूट आहे तर वजन 250 किलोपेक्षाही जास्त आहे.

green anaconda snake

green anaconda snake

follow google news

बातम्या हायलाइट

point

ॲमेझॉनमध्ये सापडला महाकाय Green Anaconda

point

जगातील सर्वात मोठा ग्रीन ॲनाकोंडा सापडला

Green Anaconda: ॲमेझॉन जंगलातील सगळ्यात रहस्यमय आणि शक्तिशाली प्राणी म्हणून ॲनाकोंडाला ओळखले जाते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून ॲमेझॉनमध्ये सापावर अभ्यास सुरु आहे. हा अभ्यास आणि संशोधन सुरू असतानाच पृथ्वीवरील सगळ्यात वजनदार साप सापडला असून हा नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा (Green Anaconda) म्हणूनही तो ओळखला जात आहे.

हे वाचलं का?

ज्या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला आहे, तो व्हिडिओही ट्विटरवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे ग्रीन ॲनाकोंडाची खूप चर्चा होऊ लागली आहे.

लांबी 25 फूट वजन  250 किलो

ग्रीन ॲनाकोंडा हा जगातील सगळ्यात मोठा साप आहे. त्याचबरोबर जगातील सगळ्यात लांब सापामध्येही त्याची गणना केली जाणार आहे. ज्या ग्रीन ॲनाकोंडा सापाचा शोध लावण्यात आला आहे, त्याच्या डोक्याचा आकार हा माणसाच्या डोक्याच्या आकाराएवढाच आहे. त्या सापाची लांबी 25 फूट तर वजन 250 किलोपेक्षाही जास्त आहे. तर हा साप अमेरिकेतील नदीमध्ये आढळून येत असल्याचेही सांगण्यात आले. 

हालचाली मंद

ग्रीन ॲनकोंडा साप हा भव्यदिव्य असल्यामुळे त्याच्या हालचालीही मंद अशा आहेत. मात्र शिकार करताना तो प्रचंड जलदगतीने झडप घालून शिकार करू शकतो. शिकार करताना तो एकाद्या प्राण्याचं शरीर ताकदीने तो त्याची श्वास घेण्याची शक्तीच मारून टाकतो.  

चार प्रजाती

सापावर संशोधन करत असताना आणि त्या जीवांचा कार्यकाळ तपासत असतानाच सध्याच्या अॅमेझॉनमध्ये शोध सुरु झाला. ऐतिहासिक पातळीवर ॲनकोंडाच्या चार प्रजाती असित्वात आल्याचे लक्षात आले आहे. त्या प्रजातीमध्ये ग्रीन ॲनाकोंडा ही प्रजत सगळ्यात मोठी असल्याचे सांगण्यात आले. 

डोळ्याची वेगळी ठेवण

ग्रीन ॲनाकोंडा हा साप आपलं सगळं आयुष्य तो पाण्यात व्यथित करतो. तर त्याच्या नाकपुड्या आणि डोळे हे शरीराच्या वरच्या भागात असतात. त्यामुळे पाण्यात राहूनही त्याला बाहेरची शिकार करता येते.

प्राण्यांना गिळू शकतो

ग्रीन ॲनाकोंडा हा ऑलिव्ह म्हणजेच हिरव्या रंगाचे असतात. त्यावर मोठे काळे डागही असतात. त्यामुळे जिथं हिरवाई असेल तिथे ग्रीन ॲनाकोंडा दिसून येत नाही. हे साप सहसा ॲमेझॉन आणि ओरिनोको खोऱ्यामध्येच आढळतात. ग्रीन ॲनाकोंडा साप मगर, हरिण, लहान गाय यासारखे प्राणी एकाच वेळी गिळू शकतात एवढे ते भव्यदिव असतात.

शिकार करण्याची अजब पद्धत

ग्रीन ॲनाकोंडा हे विषारी नसतात. ग्रीन ॲनाकोंडाकडून शिकार करण्याची एक पद्धत आहे. शिकार करताना तो कोणत्याप्राण्याला ताकदीने असा दाबतो की, त्याची हाडं क्षणात मोडली जातात. त्या प्राण्याला नंतर श्वासही घेता येत नाही.त्यानंतर तो प्राण्याला अखंडपणे गिळू शकतो. नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, त्रिनिदाद, गिनी, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना येथेही आढळत असल्याचे संशोधकाने सांगितले आहे.

    follow whatsapp