PM Modi Ganpati and CJI DY Chandrachud: नवी दिल्ली: देशभरात सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून मनोभावे बाप्पाची पूजा केली जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही आपल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. याच निमित्ताने आज (11 ऑगस्ट) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. (pm goes for ganpati pooja at residence of cji dy chandrachud)
ADVERTISEMENT
यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते आरतीही करण्यात आली. त्यावेळी धनंजय चंद्रचूड आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. ज्याचा व्हिडिओ आणि काही फोटो देखील आता समोर आले आहेत.
हे ही वाचा>> Ganesh Chaturthi: 2025, 2026, 2027 साली कोणत्या तारखेला येणार गणपती बाप्पा? पुढच्या वर्षी तर...
पंतप्रधान मोदींचा खास मराठमोळा वेश
दरम्यान, धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष असा मराठमोळा वेश परिधान केला होता. त्यांनी कुडता, धोतर, उपरणं आणि गांधी टोपी या गोष्टी परिधान केलेल्या.
ADVERTISEMENT