Akola Latest News : राज्यात गुन्हेगारी घटना वाढल्या असून, अकोल्यात सावकाराने जमिनीसाठी भयंकर कृत्य केल्याचे समोर आले आहे. शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या व्यक्तीला चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Akola Crime News)
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार काय म्हणाले, तेही वाचा
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाणे शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या वडीलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली.
महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे.
शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अपघात -ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी "सेटलमेंट" करू नये."
हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावातील आहे. सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. 17 मे रोजी ही घटना घडली होती, त्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT