Ujjain Rape : 12 वर्षाच्या मुलीच्या अब्रुचे तोडले लचके, रक्तबंबाळ मुलगी दारोदार फिरली, पण…

भागवत हिरेकर

28 Sep 2023 (अपडेटेड: 28 Sep 2023, 07:28 AM)

ujjain rape news : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका रिक्षा चालकासह तिघांना अटक केली आहे.

An accused has been arrested in the case of brutality against a 12 year old girl in Ujjain, Madhya Pradesh.

An accused has been arrested in the case of brutality against a 12 year old girl in Ujjain, Madhya Pradesh.

follow google news

Ujjain rape case news in marathi : भगवान शिवाचं वास्तव्य असलेली महाकाल नगरी एका सैतानी कृत्याने हादरली. 12 वर्षाच्या मुलीच्या अब्रुचे नराधमांनी लचके तोडले. वासनांध झालेल्या आरोपींनी मुलीच्या अंगावरचे कपडे फाडले. तिला रक्तबंबाळ करून सोडले. नराधमांनी बलात्कार करून सोडून दिल्यानंतर मुलगी मदतीसाठी दारोदार भटकत राहिली मात्र कुणीही तिची मदत केली आहे. या घटनेने देश हादरला आहे. (A 12-year-old girl was raped and found bleeding on a street in Madhya Pradesh’s Ujjain city)

हे वाचलं का?

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पीडित मुलगी पडली होती. पण, त्यापूर्वीचे जे व्हिडीओ समोर आले, ते हादरवून टाकणारे आहे. अंगावर फाटलेले कपडे, रक्तस्राव आणि मदत मागताना मुलगी दिसत आहे. हे व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारे आहेत. मुलगी एका कॉलनीत येते, तिथे मदत मागते, पण लोक तिला मदत करत नाही. ती तशीच पुढे जाते, हे दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारे आहे.

मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली

उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, सोमवारी उज्जैनच्या महाकाल पोलीस स्टेशन परिसरात सुमारे 12 वर्षांची एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं.

– एसपींनी सांगितले की, अल्पवयीन मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मंगळवारी (27 सप्टेंबर) इंदूरला पाठवण्यात आले. या प्रकरणी महाकाल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

– पोलिस अधीक्षक म्हणाले, ‘या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर अटक करता येईल.

हेही वाचा >> मुलुंडमधील भयंकर घटना! आईच्या ओळखीने आधी घरात आला, नंतर मुलीला एकटं बघून…

– पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उज्जैनमधील जीवनखेरी भागात एका ऑटोमध्ये बसली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून ही माहिती समोर आली. आरोपी चालक राकेशच्या ऑटोवर रक्ताचे डाग आढळून आले. या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याच वेळी, ऑटोची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या ऑटो चालकाचे वय 38 आहे. याशिवाय अन्य तीन जणांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा >> Pune Accident : तीन मृतदेह, दोघं जिवंत रात्रभर विहिरीत…,अंगावर काटा आणणारा रिक्षा अपघात

त्याचवेळी, ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य तीन जणांपैकी एक ऑटोचालकही आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

याशिवाय, पोलिसांनी 8 किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे, जिथे पीडित महिला मदतीची याचना करत पायी चालत गेली होती. त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

शस्त्रक्रिया करावी लागली

दुसरीकडे, उज्जैन शहरात बलात्कार झालेल्या मुलीवर इंदूरमधील सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली. पीडितेची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. पीडितेला गंभीर अवस्थेत मंगळवारी उज्जैन येथून इंदूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

प्रकृती धोक्याबाहेर : गृहमंत्री

याआधी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, पीडित मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गृहमंत्री म्हणाले, ही मुलगी उज्जैनच्या बाहेरील भागातील असल्याचे दिसते. ती योग्यरित्या प्रतिसाद देऊ शकत नसल्याने (घटनेबाबत). त्यामुळे तज्ज्ञ आणि समुपदेशकांच्या मदतीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    follow whatsapp