Nashik Crime: मुंडकं छाटलं, सापडला फक्त धडासह मृतदेह.. थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

21 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 08:32 PM)

Decapitated body of a youth has been found in Saikheda: नाशिक: निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र, या घटनेचा भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास […]

Mumbaitak
follow google news

Decapitated body of a youth has been found in Saikheda: नाशिक: निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मुंडके छाटलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा, त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र, या घटनेचा भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. (a decapitated body of a youth was found in godavari river at saikheda in niphad taluka nashik)

हे वाचलं का?

संशयित जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे,योगेश जगदीश संगमनेरे, शेतमजुर शरद वसंत शिंदे, अलीम लतीफ शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत.

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे या दोघा भावांचे शेत असून या ठिकाणी त्यांनी मागील महिन्यात पेठफाटा येथून हितेश नावाच्या मजुराला शेत कामासाठी आणले होते. तेव्हापासून हितेश हा शरद आणि अलीमसोबत काम करत होता.

दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हितेश आणि शरद यांच्यात मोबाइल घेण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. यात हितेशने शरद आणि अलीम याला नाशिकहून साथीदार आणून तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिली होती. यावेळी संतापलेल्या अलीम याने हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. ज्यामध्ये हितेशचा जागीच मृत्यू झाला.

औरंगाबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून बहिणीला कोयत्याने गळा चिरून संपवलं

त्यांनतर शेतमालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे घटनास्थळी आले आणि त्यांनी हा प्रकार पाहिला. यावेळी आपल्या हातून बटाईतसाठी घेतलेली जमीन जाईल, गावात बदनामी होईल या चिंतेने त्यांनी मयत हितेश याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार शरद याने बाजूला पडलेल्या कुऱ्हाडीने मयत हितेश याचे शीर वेगळे करत धड गोदावरी नदीत टाकून दिल्याचे संशयितांनी पोलीस चौकशीत सांगितले आहे.

Parbhani Crime : गाढ झोपलेल्या पत्नीचं मुंडकं छाटलं, शिर हातात घेऊन पती गावभर फिरला!

मात्र, या घटनेतील मयत याचे शीर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे या मृतदेहाची पूर्णपणे ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मात्र सांगितले की, आम्ही फॉरेन्सिक टीमची मदत घेत आहोत. गोदावरी नदी पात्रात मिळून आलेला शीर नसलेला मृतदेह नेमका कोणाचा हे मात्र फॉरेन्सिक टीमचा तपास पूर्ण झाल्यावरच समजणार आहे. मात्र पोलिसांचा दावा आहे की, त्यांना खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलं आहे.

    follow whatsapp