Amravati: सोनाराला लुटण्यासाठी पाडला रक्ताचा सडा, हत्या करत 75 लाखांचे ऐवज लंपास!

रोहिणी ठोंबरे

28 Nov 2023 (अपडेटेड: 28 Nov 2023, 12:24 PM)

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा शहरात 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका सोनाराची हत्या करण्यात आली. संजय मंडले असे मृत सोनाराचे नाव आहे. त्यांचे वय सुमारे 55 वर्षे होते.

Amravati Crime News Robbers Entered into the House and killed the goldsmith 74 lakhs Worth Jewellery looted

Amravati Crime News Robbers Entered into the House and killed the goldsmith 74 lakhs Worth Jewellery looted

follow google news

Maharashtra Crime News: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा शहरात 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका सोनाराची हत्या करण्यात आली. संजय मंडले असे मृत सोनाराचे नाव आहे. त्यांचे वय सुमारे 55 वर्षे होते. त्रिमूर्तीनगर येथील त्यांच्या घरी ते एकटेच असल्याची संधी साधून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यादरम्यान काही दरोडेखोरांनी (Robbers) अचानक घरात घुसून हल्ला केला. सोनाराची हत्या केल्यानंतर या चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह 75 लाख रुपयांचा ऐवज लुटला. (Amravati Crime News Robbers Entered into the House and killed the goldsmith 74 lakhs Worth Jewellery looted)

हे वाचलं का?

वाचा: साडीने गळा घोटतो! 5 महिन्यात केल्या 9 हत्या, हल्लेखोराच्या दहशततीत महिला

पोलीस तपासात काय समजलं?

या घटनेचा तपास केला असता मृत संजय यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात होते आणि संजय हे संध्याकाळच्या वेळी घरी एकटेच होते. त्याचवेळी बदमाश घरात घुसले. त्यांना विरोध करण्याचा संजय यांनी प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांची हत्या केली.

वाचा: Crime : चव बिघडली अन् आईचा विळ्याने चिरला गळा, पोलिसही हादरले

दरोडेखोरांना रोखण्याच्या प्रयत्नात गमावला जीव

दरोडेखोरांनी सोनार संजय यांच्या घरात घुसताच त्यांना डांबून ठेवलं. यानंतर त्यांनी घरात ठेवलेले दागिने लुटण्यास सुरुवात केली. या सर्वाला विरोध केला असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. अनेकवेळा चाकूने वार केल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. संपूर्ण घरभर रक्ताचा सडा पडलेला होता. अशाप्रकारे, एकीकडे पत्नी प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात उपस्थित होती तर दुसरीकडे पतीची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    follow whatsapp