Waris punjab de : पंजाबमधील अमृतसर येथील ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग (waris punjab de head amrutpal singh) याच्या समर्थकांनी आज अजनाला पोलिस ठाण्यावर (ajnala polis station) हल्ला केला. यात सहा पोलीस जखमी झाले असून, त्यांना अजनाळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृतपाल सिंह म्हणाला की, आमच्या एका सहकाऱ्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती, तो निर्दोष आहे. त्याचा छळ केला जात आहे. एफआयआरमधून नाव न काढल्यास पोलीस स्टेशनला घेराव घालण्याची धमकी अमृतपाल सिंग यांनी दिली होती. Occupying the police station with swords and guns
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंह यांच्या समर्थकांची अमृतसरमध्ये पोलिसांशी झटापट झाली. याप्रकरणी अमृतसरच्या एसएसपीने सांगितले की, अमृतपालने पुरावे दिले आहेत, तुफान सिंग दोषी नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे उद्या तुफान सिंगची सुटका होईल. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डीतून एका दहशतवाद्याला अटक, महाराष्ट्र आणि पंजाब ATS ची मोठी कारवाई
हिंदु राष्ट्राची मागणी होऊ शकते तर खलिस्तानची का नाही? : अमृतपाल
दुसरीकडे, या प्रकरणाबाबत अमृतपाल सिंह म्हणाले की, आम्ही खलिस्तानचा मुद्दा अतिशय शांततेच्या मार्गाने पुढे नेत आहोत. जेव्हा लोक हिंदु राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही. अमृतपाल म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजावी लागली. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत. माझ्यावर आणि माझ्या समर्थकांवर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत.
अमृतपाल म्हणाला की, भारत हा लोकशाही देश असेल तर शांततापूर्ण आंदोलन चिरडले जाऊ नये. आपल्या पूर्वजांनी देशाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपला धर्म आणि आपला समाज वाचवण्यासाठी आपणही बलिदान द्यायला तयार आहोत. पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणी अमृतपाल सिंहचे नावही समोर आले होते. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनीही या हत्या प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती.
यानंतर पोलिसांनी ‘वारीस पंजाब दे’चे प्रमुख अमृतपाल सिंग याला मोगाच्या सिंगवाला गावात नजरकैदेत ठेवले होते. वास्तविक अमृतपाल सिंह जालंधरच्या विशाल नगरमध्ये कीर्तनासाठी निघणार होता, तेव्हा पोलिसांनी अमृतपालला गुरुद्वाराजवळ नजरकैदेत ठेवले.
Women T20 World cup : भारत आणि ऑस्ट्रेलियात फायनलसाठी लढत; कोण मारणार बाजी?
अमृतपालच्या समर्थकांनी केला हल्ला, बॅरिकेट्स तोडले
अमृतपालच्या साथीदाराच्या अटकेच्या निषेधार्थ, पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या समर्थकांनी तलवारी आणि बंदुकांसह पोलीस बॅरिकेड्स तोडले. अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. सुधीर सुरी हत्येप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर संदीप सिंगला घटनेनंतर काही वेळातच अटक केली होती. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या गाडीवर खलिस्तानींचे पोस्टर चिकटवण्यात आले होते. याशिवाय संदीपच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील नुकत्याच झालेल्या पोस्टवरून तो कट्टरपंथी असल्याचे समोर आले आहे.संदीप सिंगने अमृतपाल सिंगचे अनेक व्हिडिओ त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले होते. ज्यामध्ये खलिस्तान समर्थक नेत्याला भेटल्याचा व्हिडिओही होता.
अमृतपाल हा खलिस्तानी समर्थक मानला जातो
अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक मानला जातो. अमृतपालला सप्टेंबरमध्ये संस्थेचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. ‘वारीस पंजाब दे’ ही संघटना अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धूने स्थापन केली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता.
अमृतपाल म्हणाला, एका तासात केस रद्द न झाल्यास प्रशासन जबाबदार असेल
‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याने एफआयआर केवळ राजकीय हेतूने नोंदवण्यात आल्याचे म्हटले आहे. जर त्याने एका तासात केस रद्द केली नाही तर पुढे जे काही घडेल त्याला प्रशासन जबाबदार असेल. ज्यांना वाटतं आम्ही काही करू शकत नाही, त्यामुळे हा ताकदीचा दिखावा आवश्यक होता, असं तो म्हणाला.
ADVERTISEMENT