आसामची (assam) 28 वर्षीय पोलीस सब इस्पेक्टर जूनमोनी राभा (junmoni rabha) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. कारने जात असताना समोरून आलेल्या कंटेनरशी समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली होती. पोलिसाच्या या अपघाती मृत्युमुळे आसाम पोलीस दलात एकच खळबळ उड़ाली आहे. दरम्यान या दंबंग पोलीसाचा अपघात झालाय की हत्या करण्यात आली आहे, असा सवाल आता पोलिस दलातून उपस्थित होतोय. या घटनेचा पोलीस आता तपास करतायत. (assam nagaon police sub inspector junmoni rabha death road accident contriversies)
ADVERTISEMENT
कार अपघातात मृत्यू
नागांव जिल्ह्यात जूनमोनी राभा (junmoni rabha) यांच्या कारची एका कंटेनरशी समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली होती.. मंगळवारी सकाळी हा अपघात घडला होता. या अपघातात जूनमोनी राभा गंभीर जखमी झाल्या होत्या त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कालियाबोर उपविभागातील जाखलाबांध पोलीस स्टेशन हद्दीतील सरुभुगिया गावात झाला.
हे ही वाचा : साखरपुड्यानंतर बलात्कार… लग्न दुसऱ्या मुलीशीच, नवरदेवाची पोलिसांनीच काढली वरात!
कोण आहे जूनमोनी राभा?
जूनमोनी राभाचा (junmoni rabha) जन्म 1 जुलै 1993 साली आसामच्या कामरूप जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव कमल राभा असून त्यांचे निधन झालेले आहे. जूनमोनीला पहिल्या पासून पोलीस दलात जायचे होते.त्यामुळे तिने तिचे शिक्षण पूर्ण करून आसाम पोलीस दलात दाखल होण्याची तयारी केली होती. अपार मेहनतीनंतर जुनमोनीची 1 जुलै 2017 रोजी आसाम पोलीस ठाण्यात सब इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर जुनमोनीने अनेक भागात कर्तव्य बजावले. 13 डिसेंबर 2021 रोजी नागांव पोलीस विभागात तिचे ट्रान्सफर झाले होते.
जूनमोनी राभाला अटक
जूनमोनी राभाने तिचा होणारा नवरा राणा पोगागला ही अटक केली होती. राणा पोगाग हा स्वत:ला ओएनजीसीचा जनसंपर्क अधिकारी असल्याचा दावा करायचा. आणि ओएनजीसीत नोकरी देण्याच्या बहाण्याने लाखो रूपये लुबाडायचा. जुनमोनीला देखील राणाने ओएनजीसीचा अधिकारी असल्याचेच सांगितले होते. या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणारे होते. मात्र तत्पुर्वी जूनमोनीला त्याची सर्व कारनामे कळाले होते. त्यानंतर काही ठेकेदारांनी जुनमोनी आणि तिचा प्रियकर राणा पोगागवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आऱोप केला होता. या आरोपानंतर जूनमोनी राभाची दोन दिवस चौकशी करून 5 जून 2022 रोजी अटक केली होती. या अटकेनंतर तिला 14 दिवसांची कोठ़डी सुनावली होती. जुनमोनीचे पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आले होते.त्यानंतर पुन्हा एकदा त्या पोलीस सेवेत रूजू झाल्या होत्या.
हे ही वाचा : लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…
भाजप आमदारासोबत वाद
जूनमोनी राभा (junmoni rabha)यांचे जानेवारी 2022 रोजी भाजपा आमदारासोबत वाद झाला होता. बिहपुरिया मतदारसंघातील भाजप आमदार अमिया कुमार भुईया यांच्याशी तिचे टेलिफोनिक संभाषण लीक झाले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच भुईंच्या मतदारसंघातील लोकांना त्रास दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
जूनमोनी राभा (junmoni rabha) हिच्या विरोधात उत्तर लखीमपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारी कट, दरोडा, खुनाचा प्रयत्न, चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे, खंडणी आदी प्रकरणीत गुन्हा दाखल झाला होता. एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आसामचे डीजीपी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी दिली होती. दरम्यान या प्रकणानंतर आता जूनमोनी राभा हिच्या अपघाती मृत्यूनंतर आसामचे डीजीपी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT