बारामतीत 4 महिन्यापूर्वी झालेल्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या पाच आरोपींमध्ये दोन आरोपी मृत तरूणाचे आई-वडील निघाले आहेत. त्यामुळे घटनेची उकल होताच पोलिसांना देखील हादरा बसला आहे. आता आई-वडीलांनीच पोटच्या पोराची हत्या का केली ?असा प्रश्न यानिमित्त समोर येत आहे. (baramati crime news mother and father killed her boy shocking story)
ADVERTISEMENT
बारामती तालुक्यातील सिरसुफळ गावातील तलावात 26 मे ला सौरभ पोपट बराटे (35) या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरूणाचे हात-पाय बांधत त्याच्या मृतदेहाला मोठा दगड बांधून त्याला तलावात बुडवण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या हाती कोणताच सुगावा लागला नव्हता. अखेर तब्बल 4 महिन्यांनंतर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आई-वडिलांसह तीन आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा : Rajasthan News : ती ओरडत होती पण…, गर्भवती पत्नीची गावातून काढली नग्न धिंड
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की, मयत सौरभ बराटे हा दारू पिऊन आई-वडिलांचा छळ करायचा त्यांना बेदम मारहाण करायचा. सौरभला त्याच्या नातेवाईकांनी अनेकदा समजावण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्याच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे अखेर सौरभच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून आई-वडीलांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार आई-वडिलांनी त्याच्याच गावातील तीन मुलांना आपल्याच मुलाला मारण्याची सुपारी दिली. आरोपींनी 26 मे रोजी 1 लाख 75 हजार रुपयांची सुपारी घेऊन सौरभची हत्या केली. या हत्येनंतर मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधून सिरसुफळ गावातील तलावात फेकून दिले होते.
पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सूरू केला असता हत्येनंतर मृत सौरभचे आई-वडील गाव सोडून निघून गेल्याचे समोर आले. ते गावी परतले तेव्हा सौरभ त्याच्यासोबत नव्हता, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या मुलीकडे गेल्याचे खोटं कारण सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सौरभच्या बहिणीचीही चौकशी केली असता सर्व पितळं उघडं झालं.
मयत सौरभ दारू पिऊन आई-वडिलांशी भांडण करायचा, त्यांना मारहाण करायचा. या मारहाणीला कंटाळून त्याने सौरभला हत्येची सुपारी दिल्याची पोलिसांना कबुली दिली.याप्रकरणी पोलिसांनी आई मुक्ताबाई पोपट बराटे, वडील पोपट भानुदास बराटे, बबलू तानाजी पवार, बाबा गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे यांना कलम 302 अन्वये अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT