Bihar Crime : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात एका पुजाऱ्याची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर पुजाऱ्याचे डोळे काढण्यात आले असून, पुजाऱ्याचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुजारी बेपत्ता (Missing Case) असल्याचे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याची घटना घडली आहे. या झटापटीत 2 पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
पुजाऱ्यासाठी वाहन पेटवले
गोपालगंज जिल्ह्यातील दानापूर गावातील शिव मंदिराचे पुजारी मनोज कुमार गेल्या 6 दिवसांपासून बेपत्ता होते. त्या प्रकरणी त्यांचे भाऊ अशोक कुमार साह जे भाजपचे माजी मंडल अध्यक्ष आहेत. त्यांनी मनोज कुमार घरातून मंदिरात गेल्यावर बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला होता, मात्र त्यांचा काही शोध लागला नव्हता. मात्र शनिवारी पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला त्यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक करून त्यांनी पोलिसांनी गाडीही पेटवून देण्यात आली. त्यामुळे हा प्रचंड विकोपाला गेला होता.
हे ही वाचा >> ‘माझ्या आजीसमोर रश्मिका पाणी कम चाय’,असं का म्हणाले सदावर्ते?
कुटुंबीयांसाठी धक्कादायक
पोलिसांवर दगडफेक करून त्यांच्या वाहनाला आग लावण्यात आल्यानंतर पोलिसांनीही हवेत गोळीबार केला. गोपालगंजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजल यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी नागरिकांना शांत करून वाद मिठवण्याचा प्रयत्न केला. मनोज कुमारचा यांचा भाऊ सुरेश यांना वाटत होते की, मनोज बेपत्ता झाला नसून ते मंदिरातून कुठे तरी बाहेर गेले असतील आणि ते पुन्हा घरी येतील असा त्यांना विश्वास होता. मात्र त्यांची हत्या झाल्याची घटना ही आमच्यासाठी धक्कादायक होती अशी भावना त्यांच्या भावांनी व्यक्त केली.
कोणावरही संशय नाही
या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले. यावेळी त्यांच्या पुजाऱ्यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने कोणावरही संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस तपास करत असून लवकर त्याचा छडा लावला जाईल असंही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT