Murder : फडणवीसांच्या नागपुरात BJP पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, मध्यरात्री ढाब्यावर काय घडलं?

प्रशांत गोमाणे

11 Nov 2023 (अपडेटेड: 11 Nov 2023, 11:50 AM)

राजू डेंगरे हा पाचगाव येथे ढाबा चालवायचा. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी राजू डेंगरे यांच्यावर काठ्या व दगडाने हल्ला करून त्यांची हत्या केली.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Nagpur Bjp Leader Raju Dengre Murder : : नागपूरमधून (Nagpur)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजू डेंगरे (Raju Dengre) असे ठार झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. राजू डेंगरे यांची जिल्ह्यातील पाचगाव (Pachgaon) येथे हत्या करण्यात आली आहे.या घटनेने परीसरात खळबळ माजली आहे.या हत्येमागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (bjp officer raju dengare killed in panchgaon nagpur crime story)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, राजू डेंगरे हा पाचगाव येथे ढाबा चालवायचा. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी राजू डेंगरे यांच्यावर काठ्या व दगडाने हल्ला करून त्यांची हत्या केली.हत्येनंतर आरोपींनी काउंटरमधील पैसे आणि मयताची कार घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, नंतर आरोपीच्या कारला अपघात झाला आणि नंतर आरोपींनी कार विहिरगाव येथील नागनदी पुलाजवळ टाकून तेथून पळ काढला. दरम्यान राजू डेंगरे यांच्या हत्येचे वृत्त समजताच भाजपचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमा झाले. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : ‘तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं, तर माझ्या आयुष्याचं विमान..’, खडसेंचा CM शिंदेंना फोन

कोण आहेत राजू डेंगरे?

राजू डेंगरे हे नागपूर ग्रामीणचे सरचिटणीस होते. काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही राजू डोंगरे विजयी झाले होते. त्याच्या हत्येमागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली की अन्य काही हेतू होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : ब्रह्मकुमारी आश्रमात सख्खा बहिणींनी संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये आसाराम बापूचा

दरम्यान या हत्येचा तपास कुही पोलीस करत आहेत. राजू डोंगरे यांची हत्या झाल्याने नागपूरात शहरात खळबळ उडाली आहे.
राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp