Murder Case : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पिदुगुरल्ला परिसर तिहेरी हत्याकांडामुळे हादरला होता. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कुटुंबातील तिघांची हत्या (Three killed) केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या तीन हत्या झाल्या आहेत, त्यामागील कौटुंबिक वाद (Family disputes) झाले होते. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 26 वर्षाच्या माधुरीचा विवाह पिदुगुरल्ला मंडलच्या कोनकीमधील नरेशसोबत झाला होता. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरु झाले होते. गेल्या बुधवारीही माधुरी आणि नरेशमध्ये किरकोळ कारणावरून टोकाचे भांडण झाले होते. माधुरी आजारी असल्यामुळे ती शेतात जाऊ शकली नव्हती, त्या कारणावरुन तिचा आणि नरेशचा जोरदार वाद झाला होता.
ADVERTISEMENT
बहिणीचा गळा आवळला अन्
नवरा-बायकोचा वाद झाल्यानंतर माधुरीने हा वाद आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले. माधुरीला मारहाण केल्याचे समजल्यानंतर माधुरीचे वडील सुब्बाराव आणि तिचा भाऊ श्रीनिवास माधुरीच्या सासरी म्हणजेच पालनाडू जिल्ह्यातील पिदुगुरल्ला तालुक्यातील कोनकी गावात पोहचले. त्यानंतरही त्या दोघांचा वाद सुरुच होता. हा वाद वडील आणि भावासमोर चालू असतानाच नरेशने माधुरीचा गळा आवळला होता. माधुरीचा गळा आवळताच श्रीनिवासला राग अनावर झाला आणि त्याने नरेश आणि त्याच्या आई वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली.
हे ही वाचा >> डान्स करत तरुणी झाली विवस्त्र, भंडाऱ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे उडाली खळबळ…
भाऊ, वडिलांविरोधात गुन्हा
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की तिहेरी हत्याकांड गुरुवारी सकाळी उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माधुरीचा पती नरेश, त्याचे वडील सांबशिवा राव आणि त्यांची आई आदिलक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावेळी पोलिसांनी सांगितले की, माधुरी ही नरेशची दुसरी पत्नी असून त्या दोघांना 6 वर्षांचा मुलगाही आहे. गेल्या एक वर्षापासून त्या दोघांमध्ये वाद सुरु होता. आता पोलिसांनी माधुरीचा भाऊ आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास सुरु करत आहेत.
ADVERTISEMENT