Marathi Crime News : तोतया सीबीआय अधिकारी (cbi officer) बनून सामान्य नागरीकांना लूटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत आता एका महिलेची तोतया सीबीआय अधिकाऱ्याने 2 लाख 14 हजार 465 रूपयांना फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेने जुहू पोलिसात (Juhu police) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी 24 तासात दोन आरोपींना अटक केली आहे. याचसोबत महिलेकडून उकळलेली लाखो रूपयाची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. (fake cbi officer Two and a half lakh fraud with woman police arrested tow people)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार स्नेहा शाह यांना 24 जुलै रोजी कुरीअर कंपनीतून एक निनावी फोन आला होता. तुमचे पार्सल आले आहे, मात्र ते कस्टम ड्यूटी प्रकरणात अडकले आहे, अशी माहिती या फोनवरील संभाषणात देण्यात आली होती.या फोननंतर काही दिवसांनी पुन्हा महिलेला एक फोन आला होता. संबंधित फोनवरील व्यक्तीने स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत महिलेकडून 2 लाख 14 हजार 465 रूपयांची फसवणूक केली होती.
हे ही वाचा : Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story
दरम्यान या प्रकरणात महिलेला स्वत:ची फसवणूक झाल्याचे कळताच तिने जुहू पोलिस (Juhu police) ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन 24 तासाच्या आता दोन आरोपींना अटक केली. स्नेहा शाह यांनी स्काय अॅपच्या माध्यमातून आरोपींना रक्कम पाठवली होती. हे पैसे खातेधारकाच्या खात्यात पोहोचले होते. पोलिसांनी या संबंधित बॅंक खात्याची माहिती मागवताच एक पत्ता मुंबई उपनगरातील भाईंदरचा दाखवला तर दुसरा पत्ता मध्य प्रदेशचा दाखवला होता. अशाप्रकारे पोलिसांनी दोन्ही खातेधारकाची माहिती मिळवून सागर माने (29) आणि अशोक आचार्य (29) या दोन आरोपींना अटक केली. या प्रकणातील म्होरक्याचा शोध पोलिस घेत आहेत.
आमच्या पथकाने फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली. तसेच लवकरच फरार म्होरक्याच्याही मुसक्या आवळण्यात येतील असे जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित वर्तक यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT