Crime: नवी मुंबईत पोलिसांनी एका महिला डॉक्टरच्या (doctor) तक्रारीवरून तिचा डॉक्टर पती आणि सासूविरोधात क्रुरतेची वागणूक (Behavior of cruelty) दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदवत भोपाळचे रहिवासी असलेले डॉ. विवेक यादव (49) आणि त्यांची आई महादेवी जयपालसिंग यादव (70) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीनुसार आता या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
मुलीच्या जन्मानंतर दिला त्रास
नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या तक्रारदार महिलेने सांगितले की, 2009 ते ऑगस्ट 2022 या दरम्यान राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये तिला प्रचंड वाईट आणि क्रूर पद्धतीची वागणूक दिली आहे. यामध्ये तिने हेही सांगितले आहे की, जेव्हा तिने मुलीला जन्म दिला होता तेव्हापासून तिचा छळ केला जात होता. तिच्या आई वडिलांचा अपमान करणे, शिव्या देणे असे प्रकार तिच्यासोबत केले जात होते.
हे ही वाचा >> डॉक्टारांनीच विकले नवजात अर्भकाला, महिलेला सांगितलं बाळ मृत, त्यानंतर घडलं भयंकर…
वारंवार त्रास
डॉक्टर दांपत्याला मुलगी झाल्यानंतर त्यांनी महिला डॉक्टरबरोबर वाद घालण्यासा सुरुवात केली. मुलीच्या जन्मामुळे तिला वारंवार त्रास दिला जाऊ लागला. तिला शिव्या देणे असे प्रकार त्यांच्या घरात घडू लागले. त्या त्यांच्या त्रासाला कंटाळूनच महिला डॉक्टराने त्यानंतर पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.
कित्येक दिवसांपासून हाल
मुलीचा जन्म झाल्यामुळे जाच केला जाऊ लागला. महिला डॉक्टराचे आई वडील किंवा तिचे कोणी नातेवाईक त्यांच्या घरी आले की, त्यांच्या समोर अपमान करणे, पाहण्यांना बोलणे अशा अपमानस्पद वागणुकीमुळे महिला डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कंटाळली होती. त्यांच्या या जाचाला कंटाळूनच तिने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या विवाहितेला त्रास होता तर इतके दिवस तुम्ही शांत का बसला होता या प्रश्नाचे उत्तर मात्र त्या देऊ शकल्या नाहीत.
मारहाण आणि दुखापत
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आता तिचा पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून महिलेला क्रूर पद्धतीने वागणूक देणे, तिला मारहाण करणे किंवा दुखापत होईल अशा पद्धतीने हल्ला करणे, अपमानस्पद वागणूक देणे या कायद्यांतर्गत त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनही या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आले नाही.
ADVERTISEMENT