आधी गळा चिरला, मग मृतदेह जाळला, चार मित्रांनी अल्पवयीन मुलाला का संपवलं?

मुंबई तक

18 Jan 2024 (अपडेटेड: 18 Jan 2024, 12:55 PM)

लहान मुलांमध्ये व्हिडीओ गेम खेळण्याचा प्रचंड छंद असतो. मात्र याच छंदासाठी पश्चिम बंगालमधील एका चार मित्रांनी आपल्याच अल्पवयीन मित्राची गळा आवळून हत्या केली आहे. मात्र हे प्रकरण पोलिसांना समजले तेव्हा मात्र त्यांनाही धक्का बसला कारण त्या अल्पवयीन मुलांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी तो जंगलात जाळला होता.

Four friends strangled a minor friend for playing video games

Four friends strangled a minor friend for playing video games

follow google news

Murder Case: पश्चिम बंगालमधील (West Bengal) मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुर्शिदाबादमध्ये व्हिडीओ गेम (Video Game) खेळण्यावरून झालेल्या वादातून चार मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या (Friend Murder) केली आहे. हत्या झालेल्या मुलाचा नाव पापई दास असून तो फरक्का बॅरेजमध्ये राहत होता. पापई दास हा आपल्या आई वडिलांसोबत दास फरक्का हाऊसिंग सोसायटीत राहत होता.

हे वाचलं का?

मुलगा घरासमोरुन बेपत्ता

मुर्शिदाबादमध्ये राहणारा पापई दास हा अचानक एक दिवस घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात केली होती. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी 15 जानेवारी रोजी फरक्का बॅरेज निशिंद्रा फीडर घाटाजवळ डोंगराळ भागात एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना पोलिसांनी समजली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव तपासाला गती दिली. त्यावेळी पापईच्या वडिलांना बोलवून घेऊन मृतदेह पापईचाच आहे का त्याची विचारणा केली. त्यावेली त्यांनी तो मृतदेह बेपत्ता पापईचाच असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Rajan Salvi “मला अटक करा, जेलमध्ये टाका, पण बायको…”, ठाकरेंच्या आमदाराचा दाटला कंठ

खास मित्रांनी केली हत्या

पोलिसांसमोर पापईचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात आणून का जाळण्यात आला होता.त्याची चौकशी पोलिसांनी सुरु केली. पोलिसांनी तपास करताना त्याच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, तो त्याच्या दोन मित्रांसोबत गेम खेळत होता.

व्हिडीओ गेमसाठी हत्या

पापईच्या वडिलांनी मित्रांसोबत तो व्हिडीओ गेम खेळत होतो असं सांगितल्यानंतर त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी दरम्यान त्यांनी सांगितलेल्या गोष्टी संशयास्पद असल्याने पापईचे ते अल्पवयीन चार मित्रांनीच त्याची व्हिडीओ गेमसाठी त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर आता त्यांना ताब्यत घेण्यात आले आहे.

    follow whatsapp