Sharad Mohol : पुर्ववैमनस्य अन् 20 वर्षीय मास्टरमाईंड, पुणे पोलिसांनी सांगितला हत्याकांडाचा थरार

मुंबई तक

06 Jan 2024 (अपडेटेड: 06 Jan 2024, 02:47 PM)

कुख्यात गुंड शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांनीच त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली होती. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (20) राहणार सुतारदरा हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Sharad Mohol Dead : पंकज खेळकर, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा संपूर्ण कट त्याच्याच टोळीत शिजत होता. मात्र त्याला काडीमात्र याची कल्पना नव्हती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 20 वर्षीय तरूण मास्टरमाईंड आहे. पोलिसांनी या प्रकरणात आज पत्रकार परिषद घेऊन शरद मोहोळच्या हत्येमागचं कारण देखील सांगितले आहे. नेमकी आता त्याची हत्या का करण्यात आली? हे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

कुख्यात गुंड शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांनीच त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली होती. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (20) राहणार सुतारदरा हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर नेहमी फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा तर त्याचा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले हा या प्रकरणातील तिसरा आरोपी होता. नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांडल या दोघांचे शरद मोहोळसोबत पुर्ववैमनस्य होते. याच जुन्या वादातून शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

हे ही वाचा : राऊतांना बाळासाहेब म्हणाले, ‘चुपचाप काम कर…’ निरुपमांनी सांगितला राज्यसभा निवडणुकीचा ‘तो’ किस्सा

आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले. मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा. त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता. त्यानंतर शुक्रवारी आरोपींनी शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला होता. दुपारी एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. मोहोळ घराबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ आणि त्याच्या साथिदाराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.हत्या केल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. त्यांच्या गाडीचा क्रमांक मिळवला. त्यानंतर दोन वाहनातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याबरोबरच आणखी दोन वकिलही होते. त्या वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या वकिलांचा आता या प्रकरणात काय सहभाग आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp