Murder Case : नोएडातील बिसरखमध्ये (Bisarakh in Noida) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सोमवारी रात्री एका 55 वर्षाच्या व्यक्तीची त्याच्याच मेहुण्याकडून एका लग्न समारंभात गोळ्या झाडून हत्या (murder) करण्यात आली आहे. या घटनेची पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ही घटना घडण्यापूर्वी सोमवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त हरदेश कथेरिया यांनी या प्रकरणाती तपास करताना सांगितले की, नोएडा सेक्टर-51 मधील होशियारपूरमध्ये राहणारे अशोक यादव एका लग्न समारंभासाठी (wedding ceremony) बिसरख भागातील गौर मलबेरी फार्महाऊसवर गेले होते. त्या ठिकाणी गेल्यावर त्याच ठिकाणी आलेल्या गाझियाबादमधील शेखर यादवने त्यांची गोळ्या झाडून (Firing) हत्या केली आहे.
ADVERTISEMENT
कुटुंबामध्ये होता तणाव
काही दिवसांपूर्वी अशोक यादव यांच्या मुलाचे लग्न शेखर यादव यांच्या मुलीबरोबर झाले होते, मात्र दोघांचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण होते. त्यामुळे या दोन्ही कुटुंबामध्ये सतत ताणतणाव दिसून येत होता. मात्र अशोक यादव एका लग्नासाठी आले असताना त्यांच्यावर शेखर यादवने भर मंडपामध्ये त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा >> साडीने गळा घोटतो! 5 महिन्यात केल्या 9 हत्या, हल्लेखोराच्या दहशतीत महिला
दोघंही आले एकाच लग्नात
पोलिसांनी सांगितले की, अशोक यादव आणि शेखर यादव यांच्या मुला-मुलांची लग्न झाली होती. त्यामुळे हे दोघं नातेवाईक होते. मात्र मुलांच्या वैवाहिक आयुष्यात वाद असल्याने आणि घटस्फोटासाठी दोन्ही कुटुंबं प्रयत्न करत असल्याने गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, शेखर यादवने आपल्या परवानाधारक बंदुकीतून अशोक यादव यांच्यावर गोळीबार केला होता. त्या प्रकरणी आता अशोक यादव यांच्या कुटुंबीयांनी शेखर यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेटर आणि पाहुणेही ताब्यात
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथकांची निर्मिती केली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी काही ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. विवाह समारंभात गोळीबार झाल्याने कार्यक्रमात सहभागी पाहुणे, वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांकडेही या प्रकरणाची चौकशी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT