लग्नात नवरीची भलतीच मागणी, म्हणाली… नवऱ्यासह नातेवाईक झाले अवाक्!

मुंबई तक

21 May 2023 (अपडेटेड: 21 May 2023, 09:51 AM)

नवरीने लग्नात विचित्रच मागणी केली होती.लग्नातील तिची ही मागणी पाहून नवऱ्यासह नातेवाईक देखील अवाक झाले आहेत. दरम्यान नवरीने नेमकी अशी काय मागणी केली होती, ज्यामुळे नातेवाईकांना (guest) धक्का बसला होता, हे जाणून घेऊय़ात.

Girl weird threat wedding guest take court

Girl weird threat wedding guest take court

follow google news

Girl weird threat wedding guest take court : देशभरात लग्नसराई (wedding) सुरु आहे. या लग्नसराईत अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अड़कतायत. अशाच एका लग्न होऊ घातलेल्या कपलची बातमी समोर आली आहे. या कपलचे लग्न ठरलेले आहे. यामधील नवरीने लग्नात विचित्रच मागणी केली होती.लग्नातील तिची ही मागणी पाहून नवऱ्यासह नातेवाईक देखील अवाक झाले आहेत. दरम्यान नवरीने नेमकी अशी काय मागणी केली होती, ज्यामुळे नातेवाईकांना (guest) धक्का बसला होता, हे जाणून घेऊय़ात. (girl weird threat wedding guest take court facebook post viral)

हे वाचलं का?

नवरीची भन्नाट शक्कल…

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना नातेवाईक, मित्रमंडळींना वेळच देता येत नाही. घरगूती कार्यक्रम म्हणा किंवा लग्नसमारंभ म्हणा अशा सर्व कार्यक्रमात देखील जाता येत नाही.ज्यामुळे कार्यक्रम आयोजकांचे खुप मोठे नुकसान होते. या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी या नवरीने (bride) तिच्यात लग्नात एक शक्कल लढवली होती. ही शक्कल पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?

फेसबूक पोस्ट…

नवरीने (bride) तिच्या लग्नाआधी फेसबूकवर एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणतेय,मी ऑक्टोबर 2024 मध्ये लग्न करणार आहे. माझे माझ्या कुटुंबावर खुप प्रेम आहे,पण त्यांच्यावर मला काडीमात्र भऱोसा नाही आहे. त्यामुळे मी माझ्या लग्नाच्या पत्रिकेत स्पष्टच लिहणार आहे की, जर तुम्ही लग्नात हजर राहण्याचे आश्वासन देऊन देखील आला नाहीत तर तुमच्या वाट्याचे अन्न आणि पैसे वाया गेल्याच्या आरोपाखाली तुम्हाला कोर्टात खेचेन, अशी थेट धमकीच तिने दिली आहे. जर तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हजर राहिलात तर तुम्हाला पैसै द्यावे लागणार नाही. नवरीची ही भलतीच अट पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नवरीच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.अनेकांनी तिच्या या अटीचे स्वागत केले आहे, तर अनेकांनी विरोध केला आहे. लग्नाचे निमंत्रण देऊन येणे हा कोणता लीगल कॉन्ट्रॅक्ट तर नाही आहे, असे एका युझरने लिहले आहे. तर दुसऱ्या युझरन लिहले, ही काय जबरदस्ती आहे. इतक्या वाईट पद्धतीत कोण निमंत्रण देते? असे तुझ्या लग्नात कोण येणार आहे? असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. तरूणीचा मुद्दा समजून घ्या, जर एखाद्या कुटूंबातील 6 लोक आली नाहीत, तर तिचे 800 डॉलर म्हणजे साधारण 82 हजार 400 रूपयांचे नुकसान होईल,असे एका नेटकऱ्याने सांगितले आहे.

हे ही वाचा : आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं

नवरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडीयावर खुप चर्चेत आहे. या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

    follow whatsapp