UP Crime : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये अनेकांना चहाची सवय लागते. अशीच चहाची तलप एका नवऱ्याला आली, म्हणून त्याने आपल्या पत्नीकडे चहा (Tea) मागितला. मात्र त्याला चहा न मिळता त्याच्या पत्नीने (Wife) चहा ऐवजी त्याच्या डोळ्यात कैचीच घुसवली. (scissors Attack) त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर जखमी नवऱ्याची पत्नी फरार झाली आहे.
ADVERTISEMENT
वर्षभरापासून सुरु होते वाद
उत्तर प्रदेशातील बरौतमध्ये राहणाऱ्या अंकितचे तीन वर्षापूर्वी रमाला परिसरातील एका गावातील युवतीबरोबर लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले, मात्र त्यानंतर त्या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. तर गेल्या दीड वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद तर होतातच मात्र एकमेकांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडू लागले, त्यामुळे त्यांच्यातील वाद टोकाला गेले होते.
हे ही वाचा >>Rahul Gandhi : ‘मोदींना प्रश्न आवडला नाही अन् नाना पटोले आऊट’; राहुल गांधींचा घणाघाती हल्ला
चहा मागण्यावरुन वाद
अंकित आणि त्याच्या पत्नीचे वाद गेल्या काही दिवसांपासून सुरुच होते. मात्र काल अंकितने त्याच्या बायकोकडे त्याने चहा मागितला होता. त्याने चहा मागितला म्हणून त्याच्यावर ती प्रचंड भडकली होती, आणि ती बेडरूममध्ये निघून गेली होती. त्यानंतर ती जेव्हा बेडरूमधून बाहेर आली त्यावेळी अंकित खुर्चीवर बसला होता, त्यावेळी अचानक आलेल्या त्याच्या बायकोने हातातील कैची थेट त्याच्या डोळ्यात घुसवली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो खाली कोसळला अन् ओरडू लागला. आरडोओरड केल्यामुळे त्याचा पुतण्या आणि त्याची काका धावून आली. त्यानंतर अंकितला त्याच्या पुतण्याने आणि काकीने रुग्णालयात दाखल केले व पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलीस येताच पत्नी फरार
अंकितवर हल्ला झाल्याची तक्रार पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली. त्यावेळी अटक होईल म्हणून त्याच्या बायकोने घरातून पळ काढला. सध्या तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असून त्याच्या पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पती अंकितची चौकशी करून पोलीस त्याच्या पत्नीचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT