Crime News :
ADVERTISEMENT
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातून एका हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. गिरीडीह जिल्ह्यातील गावां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जम तारापूर गावात एका व्यक्तीने त्याच्या 12 व्या पत्नीची हत्या केली आहे. रामचंद्र तुरी (40) असं आरोपीचं नाव आहे तर सावित्री देवी असं मृत महिलेचं नाव आहे. याआधी या व्यक्तीने 11 पत्नींवर अत्याचार करुन त्यांना सोडून दिल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.(In Jharkhand, a man killed his 40-year-old wife by beating her with sticks. This woman was his 12th wife)
नेमकं काय घडलं?
दरम्यान, याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री रामचंद्र तुरी बंद खोलीत दारू पीत होता. यावेळी सावित्री देवी यांनी त्याला दारू पिण्यास मनाई केली. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. यापूर्वी या दोघांमध्ये आणि यापूर्वीच्या 11 पत्नीसोबत याच कारणावरुन त्याचा वाद झाला होता. रविवारीही अशाच प्रकारचा वाद झाला. मात्र यावेळी पत्नीने दारु पिण्यापासून अडविल्याने तो संतापला. दोघांमध्ये वाद झाले आणि प्रकरण इतके पुढे गेले की दोघेही एकमेकांशी भांडू लागले.
हेही वाचा : लग्नासाठी मुलगी बघायला आलेला तरूण, होणाऱ्या सासूलाच नेलं पळवून!
याच वादात त्याने पत्नीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच पकडून लाकडी खांबावर आपटलं. माणुसकी सोडून केलेल्या याच मारहाणीत पत्नी सावित्री देवीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोहोचलेले पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतल आहे, सावित्री त्यांची 12वी पत्नी होती, त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी होती.
हेही वाचा : 14 देश 28 गँगस्टर; भारताने तयार केली वॉन्टेड आरोपींची यादी; गोल्डी ब्रारचाही समावेश
याबाबत माहिती देताना तारापूरचे वॉर्ड सदस्य विनय साओ यांनी सांगितले की, “सोमवारी सकाळी ही घटना मला समजली. तो प्रत्येक पत्नीला मारहाण करायचा. रामचंद्रने यापूर्वी 11 लग्नं केली होती. तो प्रत्येक पत्नीला मारहाण करायचा आणि छळ करून सोडून द्यायचा. पण, यावेळी त्याने जे केले त्यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावां पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गिरिडीह येथे पाठवला. यासोबतच आरोपी पतीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT