Suicide Case : नागपुरात (Nagpur) एका 17 वर्षीय मुलाने शुल्लक कारणावरून आत्महत्येसारखं (Suicide Case) टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलाचा नाश्त्यावरून आईसोबत वाद झाला होता. हे प्रकरण कन्हान पिंपरी परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (3 डिसेंबर) त्यांना मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. (In Nagpur 17 years boy Suicide Because his mother didnit give him breakfast dead body found hanging)
ADVERTISEMENT
मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे या मुलाचा बेपत्ता झाल्याचा गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे का, याचा शोध पोलिसांनी घेतला.
वाचा: Chandrashekhar Bawankule : “देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील”
आईसोबत वाद अन् मुलांने उचललं टोकाचं पाऊल!
यावेळी मृत मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. रविवारी सकाळी त्याने आईकडे नाश्ता मागितला. मात्र तोपर्यंत काही बनवलं नव्हतं. यावरून मुलाचे आईशी भांडण सुरू झाले. त्यानंतर तो रागाने घरातून निघून गेला.
वाचा: Rajasthan निवडणुकीत अशोक गेहलोत का हरले? अगदी जवळच्या व्यक्तीकडून पोलखोल!
बराच वेळ तो परत न आल्याने त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने फोन उचलला नाही. त्यानंतर पालकांनी त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मुलाबाबत कोणतीच माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण नंतर त्यांच्या कानी जे पडलं त्याने धक्काच बसला. मुलाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाचा: Crime: उधारीमुळे कान गमावला, मित्राने तोडला कानाचा लचका!
आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याने खरोखरच आत्महत्या केली आहे की प्रकरण वेगळे आहे, याचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT