Kanpur MBBS Student Murder : महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये भावी डॉक्टरच्या आत्महत्येची घटना ताजी असताना आता कानपूरमध्ये (Kanpur) एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची (MBBS Student) अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण हत्याकांड वैद्यकीय महाविद्यालयातच घडले आहे. या संपुर्ण प्रकरणात कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्याला अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर कुटुंबियांनी मात्र हत्येचा दावा केला आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय? हे जाणून घेऊयात. (kanpur murder case mbbs student dead boy found in college basement birthday celebration fight crime news)
ADVERTISEMENT
ही संपूर्ण घटना कानपूरच्या बिठूर पोलीस ठाणे हद्दीतील रामा डेंटल कॉलेजमध्ये घडली आहे. मृत तरूणाचे नाव साहिल सारस्वत (24) होते. तो एमबीबीएससीचा विद्यार्थी होता. दोनच दिवसापूर्वी साहिलचा वाढदिवस होता. यानिमित्त त्याने मित्रांना पार्टी देऊन जल्लोषात वाढदिवस साजरा केला होता. या पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह कॉलेजच्या बेसमेंटमध्ये सापडला होता. ही घटना उघड होताच कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
हे ही वाचा : Gujarat Titans IPL 2024 Captain : टीम इंडियाचा सलामीवीर करणार गुजरातचं नेतृत्व
साहिलचे वडील बृजमोहन यांनी दिलेल्या माहितीनूसार, साहिलच्या शरीरावर जखमेच्या खुणा सापडल्या आहेत. साहिलच्या डोक्यावर जखमा आहेत, तर शरीरावर कटचे निशाण आहेत. त्यामुळे वैयक्तिक वादातून त्याची हत्या झाली आहे. कॉलेज प्रशासनाने या हत्येला अपघाती मृत्यू म्हटले आहे, तर पोलिसांकडून देखील व्यवस्थित तपास सुरु नसल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
बृजमोहन पुढे म्हणाले की, साहिलची हत्या करण्यात आली आहे. पोलीस आणि कॉलेज प्रशासनाने हे हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हत्या करणारे हॉस्टेलमध्येच आहेत. घटनास्थळी म्हणजेच कॉलेजच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. चेहऱ्यावर जखमेच्या खुणा, डोक्यावर लोखंडी सळ्यांनी मारल्याचे निशाण आहेत. या हत्येनंतर त्याचा मृतदेह बेसमेंटमध्ये ठेवण्यात आला होता.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ठाकरेंची लोकसभेसाठी रणनीती! 10 शिलेदार उतरवले मैदानात
बृजमोहन यांनी पोलिसांना एक अर्जही दिला आहे. या अर्जात 25 तारखेला काही विद्यार्थ्यांनी साहिलला मारहाण केल्याचे म्हटले आहे. या मारहाणीत त्याला गंभीर इजा झाल्या असून यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हत्या लपवण्यासाठी त्याला अपघाती स्वरूप देण्यासाठी मृतदेह बेसमेंटमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोपा बृजमोहन यांनी केला. या प्रकरणात मृताच्या वडिलांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या घटनेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा तपास सूरूआहे.
ADVERTISEMENT