kanpur murder case : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून (Kanpur) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या (Marriage) तीन दिवस आधीच एका तरूणाची हत्या करण्यात आल्याची घटना घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापून फेकण्याल आला होता, इतक्या निर्घृणपणे त्याची ही हत्या करण्यात आली होती. धर्मेंद्र कुरील असे या 27 वर्षीय तरूणाचे (boy) नाव आहे. प्रॉपर्टीच्या वादातून त्याची ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी (police) मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरु केला आहे. (kanpur murder case three days before marriage young man part cut off found dead)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारच्या पहाटे काही ग्रामस्थ नोन नदीच्या दिशेने जात होते. या दरम्यान तरगावच्या नीलम यादव यांच्या शेतात एका तरूणाचा (boy) मृतदेह सापडला होता. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती गावकऱ्यांसह पोलिसांना दिली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच एसपी दिनेश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली टीम घटनास्थळी दाखल झाली होती. तरूणाने सफेद पॅंट आणि शर्ट घातले होते. त्याचे वय साधारण 27 वर्ष होते. तसेच पोलिसांना घटनास्थळी दारूचे एक पाऊच आणि दोन खाली ग्लास सापडले होते. पोलिसांनी तरूणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे काय कारण समोर येते हे पाहावे लागणार आहे.
हे ही वाचा : Sakshi Murdered : साक्षीची एक्स बॉयफ्रेंडसोबत ‘बाईक राईड’ अन् साहिलने…
मोहनपूरच्या ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले की, मृत तरूणाचे नाव धर्मेंद्र कुरील आहे. या धर्मेंद्रच्या लग्नाची बुधवारी हळदी होती. तर 11 जुनला फतेहपूरमध्ये त्याचे लग्न पार पडणार होते. दरम्यान हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तो घऱाबाहेर निघाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता.आता प्रश्न असे उपस्थित होत आहेत की, लग्नाच्या 3 दिवसआधी त्याची हत्या कोणी केली? हत्या करून प्रायव्हेट पार्ट कापून फेकण्याचा अर्थ काय होता ? तसेच हत्येपुर्वी तो कोणासोबत होता? अशा सर्व गोष्टींचा तपास आता पोलिस करत असल्याची माहिती एसपी दिनेश शुक्ला करत आहे.
मृतांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात अद्याप कुणावरच संशय व्यक्त केला नाही आहे. मृत तरूणाजवळ करोडोची संपत्ती होती. आता या संपत्तीच्या वादातून तरूणाची हत्या करण्यात आली आहे की, हत्येमागे काही वेगळच कारण आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास एसपी दिनेश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
ADVERTISEMENT