Pune Crime : पुण्यातील उद्योगपतीची गुवाहाटीमध्ये हत्या (Murder) झाली आणि पुणे हादरून गेले. पुण्यातील उद्योगपतीची हत्या केली आहे ती, पश्चिम बंगालमधील (West Bengal) जोडप्याने. त्यामुळे त्याच्या मागे नेमंक कारण कोणतं असेल असे अनेक सवाल उपस्थित केले गेले. पुण्यातील उद्योगपतीची हत्या (Murder of businessman) गुवाहाटीमध्ये झाल्याने त्याचे धागेदोरेही मग खूप लांबपर्यंत पोहचले आहेत.
ADVERTISEMENT
मृतदेह हॉटेलमध्येच सापडला
ही सगळी घटना घडली आहे ती गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि हत्या झाली आहे ती, पुण्यातील व्यावसायिक संदीप सुरेश कांबळे यांची. संदीप कांबळे यांचा सोमवारी मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
दोघांनी घडवली हत्या
त्यानंतर मात्र धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे पश्चिम बंगालमधील दोघं या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या व्यावसायिकाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळेच सुरेश कांबळेची हत्या झाल्याचे आता उघड झाले आहे.
ओळखीचं रुपांतर प्रेमात
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 46 वर्षाचा उद्योगपती सुरेस कांबळे हा पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये राहते होते. सुरेश कांबळेचे 25 वर्षाच्या मुलीबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्याच मुलीने सुरेश कांबळेची हत्या केली आहे. सुरशे कांबळेंची आमि अंजली शॉची ओळख मागच्या वर्षी कोलकाता एअरपोर्टवर झाली होती. त्या ओळखीचे रुपांतर नंतर त्यांच्या प्रेमात झाले. आरोपी अंजली शॉ ही बिहारची राहणारी आहे, तर तिचा साथीदार विकास कुमार शॉ हा उत्तर प्रदेशातील आहे.
हे ही वाचा >> Narendra Modi Live : मोदींचे काँग्रेसला टोले, टोमणे
अनेकदा हॉटेलमध्ये वास्तव्य
अंजली आणि विकास ही दोघंही गेल्या काही वर्षांपासून कोलकात्तामध्ये राहत होती. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस आयुक्त दिंगत बाराह यांनी सांगितले की, संदीप आणि अंजलीची विमानतळावर ओळख झाल्यानंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळून आले, आणि त्यानंतर ती दोघं कोलकाता आणि पुण्यातील अनेक हॉटलमध्ये राहिली आहेत.
लग्नासाठी तगादा
पोलिसांनी सांगितले की, संदीपला अंजलीबरोबर लग्न करायचे होते म्हणून सुरेश कांबळेंनी तिच्यामागे लग्नासाठी तगादाही लावला होता, मात्र लग्नासाठी अंजली तयार नव्हती. त्यातच संदीपला 13 वर्षाची एक मुलगीही आहे. अंजलीने सुरेश कांबळेंना लग्नाला नकार दिल्यानंतर सुरेश कांबळेंनी त्यांचे खासगीतील काही फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवले. त्यामुळे घरातील माणसांनीही तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. या गोष्टीमुळेच अंजली हैराण झाली होती. त्यामुळे तिने आपल्या एका बॉयफ्रेंडला सांगून सुरेश कांबळेची हत्या केली.
फोटो दाखवून धमकी
पोलिसांनी सांगितले की, अंजलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुरेश कांबळेंना कोलकात्तामध्येच भेटणार होती, मात्र तिने संदीप यांना गुवाहाटीत बोलवून घेतले. त्यानंतर संदीप यांनी गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमधील एक रुम बूक केली होती. तर त्याच हॉटेलमध्ये विकासपण त्यांच्या शेजारच्या खोलीत राहिला होता. त्यानंतर अंजली आणि विकास या दोघांनी सुरेश यांना त्यांच्याकडील फोटो त्या दोघांनी त्यांना डिलीट करायला सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या मिठाईही आणली होती, आणि त्यामध्ये नशा आणणारे पदार्थही मिसळले होते.
विमानानं पळून जाण्याचा बेत
अंजली आणि विकास या दोघांनी आणलेली मिठाई सुरेश कांबळेंनी खाल्ली आणि त्याचा त्यांना परिणाम दिसू लागला. कारण त्या मिठाईमध्ये भांग मिक्स करण्यात आली होती, त्यामुळे त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी तिथे विकास आला आणि संदीप बरोबर त्याचा वाद झाला. त्या वादात संदीप गंभीर जखमीही झाला. तो जखमी झाल्याचे लक्षात येताच विकासन हॉटेल प्रशासनाला त्याची माहितीही दिली. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ही घटना सोमवारी दुपारी घडली होती, मात्र अंजली आणि विकासला पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी पकडले. त्या दोघांनी विमानाने पळून जाण्याचाही बेत आखला होता, मात्र पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले.
ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त
पोलिसांनी सांगितले की हे प्रेमप्रकरणातून झाले आहे, मात्र त्याच वेळी त्यामध्ये ब्लॅकमेलिंगसुद्धा आहे. त्या ब्लॅकमेलिंगुळेच संदीपचा क्रूरपणे शेवट झाला आहे. अंजलीने सांगितले की, संदीप कांबळेच्या ब्लॅकमेलिंगमुळे ती त्रस्त होती. म्हणूनच ती फोटो डिलीट करण्याची त्यांना ती विनंती करत होती, मात्र त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यातून तिघांचे वाद झाले आणि त्यातच संदीप कांबळेंचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT