Mallika Rajput चा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, कंगनासोबत चित्रपटात केली होती एन्ट्री

मुंबई तक

• 10:55 PM • 13 Feb 2024

कंगना रनौतसोबत 'रिव्हॉल्वर राणी' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मल्लिका राजपुतचा तिच्या घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने सिनेसृष्टी हादरली आहे. तिने गळफास घेत आयुष्य का संपवले याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Mallika Rajput

Mallika Rajput

follow google news

बातम्या हायलाइट

point

Mallika Rajput ने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

point

Mallika Rajput चा संशयास्पद अवस्थेत मिळाला मृतदेह

point

मल्लिका राजपुतच्या मृत्यूनं सिनेसृष्टी हादरली

Mallika Rajput Death: संगीत क्षेत्रातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गायिका विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत (Vijay Lakshmi) हिचा सुलतानपूरमधील (Sultanpur) राहत्या घरी संशयास्पद मृत्यूदेह आढळून आला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

लटकलेला मृतदेह दिसला

या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितले की, तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता, त्यामुळे आम्ही आधी लक्ष दिले नाही. मात्र त्यानंतर तीन वेळा दरवाजा ठोठवला होता. मात्र तिने दरवाजा उघडला नाही. मात्र त्यानंतर घरातील लोकांनी तिच्या घराचा दरवाजा पुन्हा ठोठवला आणि ती उघडत नसल्याचे पाहून धक्का देऊन तो उघडण्यात आला. त्यावेळी आम्हाला समोर तिचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याचे तिच्या आईने सांगितले.

हे ही वाचा >>Balasaheb Thorat: 'चव्हाण भाजपात का गेले हे चौकातील सामान्य माणूसही सांगेल'

'रिव्हॉल्वर राणी' मल्लिका

मल्लिका राजपूत ही गायिका आणि अभिनेत्रीही होती. 2014 मध्ये आलेल्या कंगना राणौतच्या 'रिव्हॉल्वर राणी' या चित्रपटात तिने काम केले होते. या क्राईम कॉमेडी चित्रपटात मल्लिकाने सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिने भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ती गायक शान बरोबर यारा तुजे या  म्युझिक अल्बममध्येही दिसली होती. मल्लिका राजपूतने 2016 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता मात्र, दोन वर्षांपासून ती राजकारणापासून लांब होती.

 कथ्थक नृत्यांगना म्हणूनही ओळख

आपली चित्रपट आणि राजकीय कारकीर्द संपल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर मल्लिका राजपूतने अध्यात्माकडे वळली होती. 2022 मध्ये तिची उत्तर प्रदेशच्या भारतीय सवर्ण संघाच्या राष्ट्रीय महासचिवपदीही निवड झाली होती. मल्लिका एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनादेखील होती. तर त्याचवेळी तिने स्वत: गझलही लिहायला सुरुवात केली होती.  

वैवाहिक आयुष्यही बिघडलं

मल्लिका राजपूतने स्वतःचे यूट्यूब चॅनलही दाखवले होते. 4 वर्षांपूर्वी तिचा प्रदीप शिंदे नावाच्या व्यक्तीबरोबर विवाहही झाला होता. मात्र तिच्या वैवाहिक आयुष्यातही समस्या आल्या होत्या, त्यामुळे ती नाराजही दिसत होती. त्यामुळे आता मल्लिका राजपूतच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

    follow whatsapp