मोठी अपडेट! घोसाळकर हत्या प्रकरणी मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

मुंबई तक

• 10:50 AM • 10 Feb 2024

अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर असलेले वाद मिठले असून आता चांगले काम करायचे आहे असं सांगत फेसबुक लाईव्ह करत असतानाच मॉरिसने घोसाळकरांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर आता त्याच्या बॉडीगार्डला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केला जात आहे.

crime news

murder case

follow google news

बातम्या हायलाइट

point

मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

point

'ते' शस्त्र मॉरिसच्या बॉडीगार्डचं

point

मॉरिसच्या बॉडीगार्डलाही ठोकल्या बेड्या

ठाकरे गटाचा  नेता आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्हच्या वेळी  गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकरांची हत्या ही इतर कोणी केली नसून त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्हवर बसलेल्या मॉरिसनेच केली होती. त्यानंतर पोलिसांनीही तपास कार्याला गतीने सुरुवात करून आता मॉरिसचा बॉडिगार्ड अमरेंद्र मिश्राला क्राईम ब्रँचने अटक केली आहे. अमरेंद्रला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या चार महिन्यापासून तो मॉरिसचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. 

हे वाचलं का?

आज न्यायालयात हजर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शस्त्राने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, ते हत्यारही त्याचेच होते. त्यामुळे पोलिसांनी ते शस्त्रही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. ते शस्त्र अनेकदा मॉरिसच्या कार्यालयात ठेवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनीही प्रत्यक्षदर्शींचे व साक्षीदारांसह अनेक लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम करत आहेत.

मोबाईलसह साहित्य जप्त

ज्या मोबाईलवरून मॉरिस आणि अभिषेक फेसबुकवर लाईव्ह केले होते, ते मॉरिसचे होते. ते थेट रेकॉर्ड करण्यासाठी ट्रायपॉडवरही ठेवण्यात आले होते. पोलिसांनीही या खटल्यात 8 जण महत्त्वाचे साक्षीदार असल्याचे सांगितले. 

लाईव्ह चालू असतानाच...

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी मुंबईत फेसबुक लाईव्ह करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अभिषेकसोबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तर त्यानंतर  अभिषेकवर गोळीबार केल्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली.

सामाजिक कार्यकर्ता

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा हा बोरिवली पश्चिम आयसी कॉलनीत राहत होता. मॉरिस हा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजत होता. तर त्याला निवडणूकही लढवायची होती.  

जुन्या वादातूनच हत्या

मॉरिस नेहमीच राजकारण्यांसोबतचे आपले अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एकमेकांत वादही झाला होता, मात्र ते मिठले आहे असंही घोसाळकर यांनी जाहीर केले होते. या दोघांमध्ये नकळतपणे स्थानिक राजकारणामध्ये स्पर्धा लागलेली. तसेच काही दिवसापूर्वी झालेल्या वादातूनही अभिषेक घोसाळकरांची हत्या करून मॉरिसनेही आत्महत्या केल्याचे आता सांगण्यात येत आहे मात्र त्याने आत्महत्या का केली असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

    follow whatsapp