झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास मुंबईतल्या एका इडली विक्रेत्याला चांगलाच महागात पडला आहे. मुंबई पोलिसांनी अंबरग्रीससह एका इडली विक्रेत्याला अटक केली आहे. आरे कॉलनीतील रॉयल पाम विभागात या इडली विक्रेत्याने अंबरग्रीस विकण्यासाठी आणले होते. जप्त करण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत बाजारात 5 कोटींच्या घरात असल्याचं कळतंय. आरोपी इडलीवाल्याचं नाव शेडू रामन श्रीनीवासन असं असून तो वसई येथे राहणारा आहे.
ADVERTISEMENT
अंबरग्रीसच्या विक्रीनंतर श्रीनीवासनला 50 लाख कमिशनमध्ये मिळणार होते. अंबरग्रीसची विक्री केल्यास कमिशन म्हणून लाखो रुपये मिळतील असं एका व्यक्तीने आरोपीला सांगितलं होतं. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आरोपीने हा पाऊल उचलल्याचं कळतंय.
आरे कॉलनी परिसरात अंबरग्रीसची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, ज्यानंतर त्यांनी इकडे सापळा रचला. दुपारच्या सुमारास इडलीविक्रेता श्रीनिवासन परिसरात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला हे अंबरग्रीस नेमकं कोणी दिलं याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
वडील मटण खायला घालत नाही म्हणून मुलाकडून टोकाचं पाऊल, कुऱ्हाडीने वार करत केली हत्या
अंबरग्रीस म्हणजे काय?
समुद्रात व्हेल माशांनी केलेल्या उलटीमधून अंबरग्रीस हा पदार्थ बाहेर पडतो. या अंबरग्रीसचा वापर महागडे परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने आणि महागडी औषधे बनवण्यासाठी केला जातो. आपल्या देशात आणि परदेशात त्याची विक्री आणि खरेदी करणे बेकायदेशीर कृत्य समजले जाते. मात्र, त्यानंतरही लाखो रुपयांच्या लोभापायी काहीजण याची तस्करी आणि विक्री करतात.
तुझ्या पॉर्न व्हिडीओतून पैसे कमावेन ! नातेवाईकांकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT