नग्न होऊन ठेकेदाराला मिठीच मारली, अन् नंतर…,नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 05:02 PM • 18 Dec 2023

रेशन कार्डसाठी एका ठेकेदाराला एका महिलेने त्यांना घरी बोलवलं, त्यानंतर ठेकेदारही घरी आला. रेशनकार्डसाठी कागदपत्रांची मागणी केल्यावर मात्र महिलेने नग्न होऊन थेट त्याला मिठीच मारली, आणि तिच्या त्या टोळीने त्या दोघांचा व्हिडीओ बनवला आणि व्हायरल करण्याची धमकीही दिली.

police arrested gang honey trap called contractor home and made obscene videos

police arrested gang honey trap called contractor home and made obscene videos

follow google news

UP Crime : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये रेशन कार्ड (Ration Card) बनवण्याच्या प्रक्रियेत कोटेदार एका महिलेच्या जाळ्यात अडकला आहे. हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) तो ठेकेदार अडकल्याने त्याने त्या महिलेला दीड लाखाची लाचही दिली होती. मात्र त्यानंतर त्या महिलेने आणखी पैशाची मागणी करत हे प्रकरण 3 लाख 30 हजार रुपयेमध्ये मिठवण्याची त्याला धमकी देऊ लागली. त्यानंतर ठेकेदारने मात्र पोलिसांकडे जात त्या महिलेविरुद्ध तक्रार करून तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्या महिलेसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

जबरदस्तीने मारली मिठी

हे प्रकरण घडले आहे ते बर्रा परिसरामध्ये, या ठिकाणी राहणाऱ्या ठेकेदाराला 14 डिसेंबर रोजी एका महिलेचा फोन आला. त्यामध्ये तिने त्याला सांगितले की, मला रेशन कार्ड बनवायचे आहे. त्यावेळी तिने हेही सांगितले की, माझ्या आईचा मृत्यू झाल्याने मी तुमच्या कार्यालयामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच माझ्या घरी येऊन कागदपत्रं घेऊ शकता का असा प्रश्नही तिनेही विचारले होते. त्यानंतर ठेकेदारही तिचे काम करण्यासाठी तिच्या घरी गेला. त्यावेळी कागदपत्र देण्याच्या बहाण्याने थेट तिने आपले कपडे काढूनच ती तिच्या जवळ गेली, आणि ती त्याला जबरदस्तीने मिठी मारू लागली.

हे ही वाचा >>  अवकाळीवरून CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, ‘शेतकरी अडचणीत असताना आम्ही…’

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

यावेळी त्या महिलेच्या टोळीतील इतरांनी त्या दोघांचा व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर त्या ठेकेदाराला त्या सगळ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ठेकेदाराकडून 5 लाखांची मागणीही करण्यात आली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने ठेकेदारानेही त्या टोळीला दीड लाख दिले. त्यानंतर पुन्हा ठेकेदाराकडे राहिलेल्या पैशांची मागणी करण्यात येऊ लागली त्यावेळी त्यांनी थेट पोलीस उपाधीक्षक रवींद्र कुमार यांच्या भेटी घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणी त्या महिलेसह हनी ट्रॅप प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली.

व्हि़डीओ करणारी टोळी

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ठेकेदारासारख्या लोकांना ही महिला आपल्या जाळ्यात ओढायची. त्यांना घरी बोलवून त्यानंतर ती आपल्या सापळ्यात अडकायची. ही टोळी चालवणारा बाबा ठाकूर नावाचा तरुण आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा, पोलिलांनी महिलेसह तिघांना अटक केली. त्यावेळी टोळी चालवणारा मुख्य आरोपी बाबा ठाकूर हा तुरुंगात असल्याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp