पुणे: पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळ वाडी परिसरात प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी फिरायला गेले असताना अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शेवरलेट कारमध्ये चार जण आले आणि त्यांनी वाघ यांना जबरदस्तीने बंदुकीचा धाक दाखवून कारमध्ये बसवले. यानंतर अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
ADVERTISEMENT
वास्तविक, सतीश वाघ यांचे नाव पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात प्रसिद्ध असून ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. पूर्वीच्या वैमनस्यातून अपहरण झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, अद्याप कोणतेही ठोस कारण स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा>> Ambarnath Crime: अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक गजाआड! 'असा' झाला पर्दाफाश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे. डीसीपी ए. राजा म्हणाले की, 'आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. प्राथमिक तपासात या घटनेमागचा हेतू पूर्वीच्या वादातून असावा, असे दिसते.'
हे ही वाचा>> Pune Accident: पायलट होण्याआधीच काळाने घातली झडप! कार चालवताना 'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली अन्...
त्याचवेळी, अपहरणकर्त्यांबाबत पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागला नसून, या प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याने अधिकाऱ्यांनी तपास गोपनीय ठेवला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT