पुणे: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. आज (9 डिसेंबर) पहाटे एका कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पुण्यातील व्यावसयिक आणि योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र, काही वेळापूर्वीच पुण्यातील यवत, दौंडजवळ झुडपात त्यांचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जात आहे. (pune crime news sensational the dead body of bjp mla yogesh tilekar maternal uncle satish wagh was found who murdered him)
ADVERTISEMENT
सतीश वाघ हे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी चार अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. या घटनेनंतर पुणे गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला. पण त्याआधीच अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून यवत येथील महामार्गाजवळील झुडपात त्यांचा मृतदेह फेकून दिला.
हे ही वाचा>> Pune Accident: पायलट होण्याआधीच काळाने घातली झडप! कार चालवताना 'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली अन्...
आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित तपशील आणि अपहरणामागील नेमका हेतू उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
अपहरण करतानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद
पुणे-सोलापूर रस्त्यावर शैवाळ वाडी परिसरात सतीश वाघ हे पहाटे फिरायला गेले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. शेवरलेटमध्ये प्रवास करणारे चार पुरुष वाघ यांच्याकडे आले आणि त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवलं आणि तेथून पळ काढला. दरम्यान, ही सगळी घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे ही वाचा>> भाजप आमदाराच्या मामाचं पुण्यात भरदिवसा अपहरण, अद्यापही पोलिसांना...
पोलिसांचा मते, व्यावसायिका वादातून त्यांचं अपहरण झालं असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आता त्यांच्या मृत्यूचं वृत्त समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सत्ताधारी आमदाराच्या मामाचीच अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने आता या प्रकरणी विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाईल.
कोण आहेत सतीश वाघ?
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे पुण्यातील शेवाळवाडी भागातच राहत होते. इथे त्यांचे ब्लूबेरी नावाचे हॉटेल असून तिथेच शेतीही आहे. सतिश वाघ यांची लोणी काळभोर भागात देखील शेती आहे. याच शेतीचा एका खटला हा कोर्टात सुरू आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT