Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. आजही पुण्यातील स्वारगेट (Swargate) परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मायग्रेनचा त्रास होत आहे म्हणून तपासणीसाठी क्लिनिकमध्ये आलेल्या तरुणीसोबत डॉक्टरने अश्लील चाळे (Obscenity) करुन तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. त्यानंतर त्या तरुणीच्या तक्रारीवरून न्युरोलॉजिस्ट डॉक्टरवर स्वारगेट पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
महिला अटेडंट गैरहजर
न्युरोलॉजीस्ट डॉ. श्रीपाद पुजारी याचा स्वारगेटमधील मुकुंदनगर परिसरात रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात जाण्यासाठी एक तरुणी आली होती. तिला मायग्रेनचा त्रास होत होता. म्हणून ती श्रीपाद पुजारीकडे आली होती. तरुणी रुग्णालयात आल्यानंतर तिला श्रीपाद पुजारीने काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तरुणी रुग्णालयात आली असताना त्यावेळी कोणीही महिला अटेडंट नव्हती. तरीही युवतीला त्रास होत असल्याने ती डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर तिच्याबरोबर डॉक्टरचे वर्तन चांगले दिसले नाही.
हे ही वाचा >> Maharashtra Crime: महिला डॉक्टरबरोबर पती आणि सासूचे भयंकर कृत्य, दोघांनी गाठली क्रूरतेची हद्द
तू एकटीच आली का?
रुग्णालयात त्या तरुणीशिवाय कोणीच नसल्याने श्रीपाद पुजारीने तिच्याबरोबर वाईट वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला प्रश्न विचारत तिला तो म्हणाला की, ‘तू एकटीच आली आहेस का? तू किती सुंदर व शांत आहेस, माझ्या राणी’ असं म्हणत त्याने युवतीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर युवतीने थेट पोलिसात जात डॉक्टरविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली.
महिलावर्गातून संताप
तरुणीसोबत घडलेल्या प्रकारामुळे महिलांना धक्का बसला आहे. ज्या डॉक्टरने हे दुष्कृत्य केले आहे. त्याच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता महिलावर्गातून वाढत आहे.
पोलिसांनी घेतले ताब्यात
या प्रकारामुळे युवतीच्या तक्रारीनंतर डॉक्टरविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने याआधी असा प्रकार केला आहे का त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. डॉक्टरला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे.
ADVERTISEMENT