Pune Accident प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीचे ब्लडचे नमुने घेताना अग्रवाल-तावरेंमध्ये काय संभाषण झालं?

दिव्येश सिंह

28 May 2024 (अपडेटेड: 28 May 2024, 10:51 PM)

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन आरोपीचे नमूने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी डॉ.तावरे यांना कॉल केल्याची माहिती आहे. तसेच या कामासाठी किती रक्कम घेतली जाणार, याबाबतची डील ही याच कॉलवर झाल्याचा संशय आहे. कारण पुणे पोलिसांनी सोमवारी केलेल्या तपासात 3 लाख रूपये जप्त करण्यात आले.

pune porsche accident news minor accused 14 facetimer call and one normal call what discussion happened with vishal agarwal and ajay taware sassoon hospital

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात दररोज नव-नवे खुलासे समोर येत आहेत.

follow google news

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात दररोज नव-नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याची बाब समोर आली होती. पण ज्यावेळेस अल्पवयीन आरोपीच्या रक्ताची चाचणी केली जात होती, त्यावेळेस अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि ससून रूग्णालयातील आरोपी डॉक्टर अजय तावरे (Ajay Taware) यांच्यात 15 कॉल्स झाले होते. या कॉल्स दरम्यान त्यांच्यात रक्ताचे नमुने (Blood Report) बदलण्याबाबत डील झाल्याची माहिती समोर आली आहे.  (pune porsche accident news minor accused 14 facetimer call and one normal call what discussion happened with vishal agarwal and ajay taware sassoon hospital)  

हे वाचलं का?

पुण्याच्या पोर्शे कारने ज्यावेळेस दोन जणांना चिरलडं होतं. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही? हे तपासण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात रक्त तपासणीसाठी पाठवले होते. 

हे ही वाचा : MVA महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? सट्टा बाजाराचा मोठा अंदाज

दरम्यान ज्यावेळेसे अल्पवयीन आरोपी ससून रूग्णालयात पोहोचला. त्यावेळेस तिकडे  डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर हे त्याच्या रक्ताची तपासणी करणार होते. आरोपीच्या वडील विशाल अग्रवाल यांना ही बाब कळताच त्यांनी साधारण 14 व्हॉट्स ॲप फेसटाइमवर कॉल केले आणि सामान्य कॉल डॉ. अजय तावरे यांना केल्याची माहिची आहे. साधारण सकाळी 8:30 ते 10:40 दरम्यान साधारण दोघांमध्ये हे कॉल्स झाले होते.

अल्पवयीन आरोपीचे नमूने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी डॉ.तावरे यांना कॉल केल्याची माहिती आहे. तसेच या कामासाठी किती रक्कम घेतली जाणार, याबाबतची डील ही याच कॉलवर झाल्याचा संशय आहे. कारण पुणे पोलिसांनी सोमवारी केलेल्या तपासात 3 लाख रूपये जप्त करण्यात आले. जे नमूने बदलण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे अग्रवाल आणि डॉ. तावरे यांच्यात संभाषण झाल्यानंतर उशीरा 11 वाजचा रक्ताचे नमुने देण्यात आले होते. ज्यामध्ये अल्पवयीन आरोपी दारू न पिता गाडी चालवत असल्याचा रिपोर्ट आला होता. 

हे ही वाचा : BJP जिंकणार की नाही, सट्टा बाजाराने कोणाचं वाढवलं टेन्शन?

दरम्यान आता या प्रकरणात दोन्ही डॉक्टरांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. 
 

    follow whatsapp