Raj Kundra Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अश्लील चित्रफितीप्रकरण आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राज कुंद्रा आणि अजून काही लोकांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता संबंधीतांच्या घरी आणि कार्यालयांची झडती घेतली जात आहे. 'अश्लील' चित्रफिती बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर तो सध्या सप्टेंबर 2021 पासून जामिनावर बाहेर आहे.
ADVERTISEMENT
कसं समोर आलं होतं प्रकरण?
हे ही वाचा >> Mumbai Bhandup School Case : मुंबईतील भांडुपमध्ये नामांकित शाळेत 3 विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन, बदलापूरची पुनरावृत्ती?
राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी फक्त पॉर्न फिल्म्सद्वारे मोठी कमाई करत होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कायद्यांना बगल देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. या रॅकेटबाबत एका तरुणीने मुंबईतीलच मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी 4 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता. काही लोक मुलींना चित्रपट आणि ओटीटीमध्ये संधी देण्याचं आमिष दाखवत अश्लील चित्रफितींमध्ये काम करण्यास भाग पाडत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. यासोबतच मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत. यानंतर पोलिसांनी मालाड पश्चिम भागातील एका बंगल्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी एका अश्लील चित्रफितीचं शूटिंग केलं जात होतं. यानंतर या छाप्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 11 जणांना अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा >> Waqf Board Fund : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर, सरकारचा मोठा निर्णय, GR मध्ये काय म्हटलंय?
राज कुंद्राशी संबंधित मोठी माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. यात पीडित मुलींचे जबाब, व्हॉट्सॲप चॅट्स, ॲपवर उपलब्ध चित्रपट आणि राज कुंद्राच्या अश्लील चित्रपटांच्या व्यवसायाचा संपूर्ण लेखाजोखा होता. त्यानंतरच राजला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज कुंद्राच्या घरी आणि कार्यालयात छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे ईडी आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT