Crime News : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातून अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. या प्रकरणातही आरोपींनी अत्यंत क्रुरपणे पीडित युवतीवर बलात्कार केला. मुलीला पोटावर आणि छातीवर सिगारेटचे चटके देण्यात आले, तसेच तिच्या शरीराच्या नाजूक भागावरही अत्यंत अमनावीय पद्धतीने जखमा करण्यात आल्या आहेत. यानंतर मुलीची हत्या करुन तिचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला एका झुडपात फेकून देण्यात आला. (Before killing the girl, she was raped and assaulted. also her stomach and chest were burnt with cigarettes)
ADVERTISEMENT
याबाबत अधिक माहिती अशी की, 12 एप्रिल रोजी सकाळी जिल्ह्यातील जाफरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बाबा कुटी मंदिराजवळील झुडपात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेह तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पीडित मुलीची ओळख पटवण्यास सुरुवात केली. अनेक प्रयत्न करूनही अद्याप त्या युवतीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, 11 एप्रिलच्या रात्री बाबा कुटीजवळ काळ्या रंगाची कार आली होती. जी काही वेळाने तिथून निघून गेली. त्या गाडीतून कोणी उतरताना किंवा बसताना दिसले नाही. पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.
Guddu Muslim : डोक्यात गोळी लागण्यापूर्वी अतिकने नाव घेतलेला गुड्डू मुस्लिम कोण?
पण पीडित मुलीच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमचा हृदयद्रावक अहवाल आज पोलिसांना प्राप्त झाला. या रिपोर्टनुसार मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करून मारहाण करण्यात आली. एवढंचं नाही तर बलात्कार करताना सिगारेटने तिच्या पोटावर आणि छाती चटके देण्यात आले होते. क्रूरतेची परिसीमा इथेच थांबली नाही, तिच्या नाजूक अवयवांवर सापडलेल्या जखमांच्या खुणा आरोपींच्या क्रूरतेची कहाणी सांगत आहेत.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आल्या या गोष्टी :
पीडित युवतीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करून मारहाण करण्यात आली. तिच्या शरीराच्या अनेक भागांवर जखमांच्या खुणा आढळल्या. तसेच अंगावरील डोके, चेहरा, छाती, घसा आणि नाजूक अवयव अशा 10 ठिकाणी सिगारेटने चटके देण्यात आले.अनेक अवयवांवर दात चावल्याच्या आणि नखे ओरबाडल्याच्या खुणाही आढळल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला गंभीर दुखापत आणि गळा दाबून मृत्यूचे कारण समोर आले आहे.
Crime : मालकाच्या हत्येनंतर मृतदेह पुरला अन् त्यावर… घृणास्पद प्रकाराने पोलिसही हादरले
पीडितेची अद्याप ओळख न पटलेलं पाचवे प्रकरण :
अज्ञात महिलेची आणि मुलीची निर्घृण हत्या करण्याची जिल्ह्यातील ही पाचवी घटना उघडकीस आली आहे. पहिली घटना जिल्ह्यातील खागा कोतवाली भागातील बरकतपूर गावातील आहे. 2018 मध्ये जीन्स टी-शर्ट घातलेल्या मुलीचा शिर नसलेला मृतदेह सापडला होता. दुसरी घटना लालौली पोलीस स्टेशन परिसरातील आहे, इथे 17 ऑगस्ट 2021 रोजी अर्ध्या जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता, तिनेही जीन्स टी-शर्ट घातलेला होता. तिसरी घटना कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौहर गावातील होती. 22 ऑगस्ट 2021 रोजी महिलेचा जळालेला मृतदेह येथे सापडला होता. चौथी घटना 24 सप्टेंबर 2021 रोजी उघडकीस आली होती. गाझीपूर पोलिस स्टेशन हद्दीतील धनसिंगपूरच्या शेतात मुलीचा मृतदेह सापडला होता.
ADVERTISEMENT