Sanjeev Jeeva murder Update : न्यायालयात सुनावणी होते आणि नंतर निकाल येतो. पण, लखनौ न्यायालयात जे घडलं त्याने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशतीला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया आणि मुख्तार अन्सारीचा निकटवर्तीय संजीव जीवा माहेश्वरी याची राजधानी लखनऊमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता याप्रकरणी नवीन माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवला मारण्याचा सौदा मुंबईत झाला होता. मुंबईतच शूटर विजय यादवला आधीच मोठी रक्कम देण्यात आली होती. (sanjeev jeeva murder connection to mumbai)
ADVERTISEMENT
मुंबईत कट रचून आरोपी विजय यादव उत्तर प्रदेशला पोहोचला, तेव्हा त्याला बहराइचमधील एका अज्ञात व्यक्तीने मॅग्नम रिव्हॉल्व्हर दिले. विजय यादवने तुरुंगात जाण्यापूर्वी प्राथमिक चौकशीत या गोष्टींची कबुली दिली आहे. पैशासाठी संजीव जीवाची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या हत्येमध्ये एक कोटींहून अधिकचा सौदा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्येतील आरोपी विजय यादव याला मुंबईत आगाऊ पैसे दिले गेले होते.
शूटर विजय यादव काही दिवसांपूर्वी गेला होता नेपाळला
संजीव जीवा हत्या प्रकरणातील शूटर विजय यादवचे नेपाळ कनेक्शन समोर आले आहे. विजय यादव काही दिवसांपूर्वी नेपाळला गेला होता, तिथे तो नेपाळच्या बड्या माफियांच्या संपर्कात होता. नेपाळमधूनच विजय यादवला सुपारी मिळाल्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. विजय यादवचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. मोबाईलमधील माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. विजयच्या मोबाईलमधील माहितीतून हत्येचे गूढ उलगडू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
विजय यादवने लखनौमधील एससी-एसटी कोर्टरूममध्ये मुख्तार अन्सारीच्या जवळचा गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवा याची हत्या केली. यावेळी न्यायालयाच्या दालनात एकच गोंधळ उडाला होता. घटनेदरम्यान न्यायाधीशांसह वकिलांनी टेबलाचा आधार घेत स्वत:चा जीव वाचवला. सर्वजण घाबरून इकडे तिकडे धावू लागले. त्यानंतर न्यायाधीश त्यांच्या खोलीत गेले होते.
या घटनेबाबत सहआयुक्त काय म्हणाले?
लखनौचे कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त उपेंद्र अग्रवाल यांनी घटनेनंतर सांगितले होते की, “संजीव माहेश्वरी जीवाला एससी-एसटी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या सुनावणीची वेळ दुपारी 3.30 नंतर होती. दरम्यान, जीवा सुनावणीसाठी कोर्ट रूममध्ये जात असताना मागून आलेल्या एका हल्लेखोराने संजीववर गोळीबार केला, त्यात तो जखमी झाला होता.”
संजीव जीवा एकेकाळी होता मेडिकल कंपाउंडर
गँगस्टर संजीव जीवा हा एकेकाळी कंपाउंडर होता. संजीवचे पूर्ण नाव संजीव माहेश्वरी होते. तो मूळचा पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा रहिवासी होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले होते. संजीव जिथे कंपाउंडर होता, त्याच दवाखान्याच्या मालकाचे त्याने अपहरण केले होते. त्यानंतर खंडणीची मागणी केली होती.
हेही वाचा >> Mira Road Murder: मृतदेहाचे अर्धे तुकडे केल्यानंतर मनोज का गेलेला ‘या’ दुकानात?
त्यानंतर तो किडनॅपिंग किंग झाला आणि माफिया मुख्तार अन्सारीचा खास बनला. सन 2021 मध्ये, संजीव जीवाची पत्नी पायलने भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून पतीच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. पायलने 2017 मध्ये आरएलडीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकही लढवली होती, ज्यामध्ये तिचा पराभव झाला होता.
कोलकात्यातील व्यावसायिकाच्या मुलाचे केले होते अपहरण
90 च्या दशकात संजीव जीवाने कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले होते. त्यावेळी त्याने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, ही त्यावेळची सर्वात मोठी खंडणी असल्याचे सांगितले जाते. यानंतर त्याने आपली टोळी झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली. या अपहरणानंतर संजीव जीवा हरिद्वारच्या नाझीम टोळीशी जोडला गेला. त्यानंतर सतेंद्र बर्नाला टोळीत सामील झाला होता.
भाजप नेते ब्रह्म दत्त यांच्या हत्येनंतर बनला कुख्यात
संजीव जीवाचे नाव त्यावेळी यूपीमध्ये चर्चेत आले होते, जेव्हा त्याने भाजपचे मोठे नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांची हत्या केली होती. या घटनेनंतर संजीवला अटक करण्यात आली. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. संजीव जीवा मुन्ना बजरंगी आणि नंतर मुख्तार अन्सारी यांच्या संपर्कात आला होता.
हेही वाचा >> Sakshi Murdered : साक्षीची एक्स बॉयफ्रेंडसोबत ‘बाईक राईड’ अन् साहिलने…
मुझफ्फरनगरचा असल्याने आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा शौकीन असलेल्या संजीव जीवानेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला होता. त्यामुळे तो मुख्तार अन्सारीच्या संपर्कात आला. मुख्तारला अशा शस्त्रास्त्रांचा आवड होती. त्यामुळे दोघांची मैत्री झाली होती.
हल्लेखोर विजय यादव हा जौनपूरचा रहिवासी
पोलिसांनी सांगितले की, 24 वर्षीय हल्लेखोराचे नाव विजय यादव असून, तो जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्याला दुपारी चारच्या सुमारास कोर्ट रूमच्या बाहेर जागीच पकडले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोराने वकिलाचा पोशाख घातला होता. त्याने सुमारे सहा गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
हेही वाचा >> भाजपचा कल्याणबरोबर ठाणे लोकसभेवरही दावा! CM एकनाथ शिंदेंवर दबाव?
आरोपी पाईपलाइन टाकण्याच्या कंपनीत करायचा काम
शूटर विजय यादव हा लखनौमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणाऱ्या एका खासगी कंपनीत 2 महिन्यांपासून काम करत होता. 11 मे रोजी तो घरी गेला होता. विजयचा मोबाईल गेल्या पंधरा दिवसांपासून बंद होता. त्याला त्याच्या कुटुंबीयांनाही बोलता येत नव्हते. लखनौपूर्वी विजय यादव मुंबईत एका खासगी कंपनीत काम करायचा. 2016 मध्ये विजयला POCSO कायद्यान्वये अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात पाठवण्यात आले होते.
ADVERTISEMENT