Sangli Accident : मुंबईत आज उद्धव ठाकरे गटाचा आणि एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईकडे येत होते. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामधील कवठेमहांकाळ (Sangli KavtheMahankal) तालुक्यातीलही काही कार्यकर्ते तवेरा गाडीने मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र आज पहाटे रत्नागिरी-नागपूर (Ratnagir-Nagpur Highway) या राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण उड्डाण पुलाजवळ तवेरा आणि टँकरचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांच्या तवेरा गाडीला दुधाच्या टँकरने (Milk Tancker) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडक इतकी जोरदार होती की, तवेराची मागील बाजू पूर्णपणे आत गेली होती. या अपघातात 1 जण ठार झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. (shivsainik car accident near Kavthemahankal in Sangli coming to Mumbai for Dussehra gathering one killed 4seriously)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘त्यांना सरकार बोलायला भाग पाडतंय’, मनोज जरांगेंचं ओबीसी नेत्यांबद्दल स्फोटक विधान
टँकर चालक फरार
मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळहून शिवसैनिक मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी तवेरा (एमएच 10 एजी 4320) गाडीचा आणि टँकरचा (एमएच 10 झेड 4481) अपघात झाला आहे. तवेरा गाडीला पाठीमागील बाजूने टँकरने धडक दिल्यानंतर टँकर चालकाने अपघातस्थळावरून पळ काढला आहे.
टँकरची भयानक धडक
तवेरा गाडीला टँकरने दिलेली धडक इतकी भयानक होती की,गाडीची मागील बाजू पूर्णपणे आत गेली होती. यावेळी तवेरामध्ये बसलेला विवेक सुरेश तेली हा युवक ठार झाला आहे. या दुर्घटनेत तवेराचे प्रचंड नुकसान झाले असून अपघातानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा >>‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ
रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरुन टँकर मिरजच्या दिशेने जात होता. तवेरा कवठेमहांकाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. टँकरने तवेराला धडक दिल्यामुळे तवेराचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT