महाराष्ट्रानंतर तेलंगणा! मागास जातीतील 2 तरुणांना उलटं लटकावलं, खाली जाळ लावून केली बेदम मारहाण; कारण…

रोहिणी ठोंबरे

04 Sep 2023 (अपडेटेड: 04 Sep 2023, 05:46 AM)

तेलंगणातील मंचिरियाल जिल्ह्यातील मंदामरी भागात ही घटना घडली. येथे शेळी चोरण्याच्या संशयावरून मेंढपाळ व त्याच्या मित्राला शेडमध्ये बोलावलं. त्यांना तिथे बोलावून उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी घडली. The incident took place in Mandamari area of Manchiriyal district of Telangana. Here the shepherd and his friend were called to the shed on suspicion of stealing a goat.

Mumbaitak
follow google news

Telangana Crime News : भारतात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अनुसूचित जातीच्या आधारे लोकांवर अत्याचार आणि भेदभावाच्या घटना रोज समोर येत आहेत. देशात असा कोणताच कोपरा नाही जिथे जातीय अत्याचाराच्या घटना घडत नाहीत. यावेळी दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातून एक अतिशय अमानवी घटना समोर आली आहे. येथे शेळी चोरण्याच्या आरोपावरून एका अनुसूचित जातीतील तरूणाला आणि त्याच्या मित्राला दोरीच्या साहाय्याने आगीवर उलटं टांगून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Telangana 2 SC caste youths were hanged upside down and brutally beaten on suspicion of stealing a goat)

हे वाचलं का?

तेलंगणातील मंचिरियाल जिल्ह्यातील मंदामरी भागात ही घटना घडली. येथे शेळी चोरण्याच्या संशयावरून मेंढपाळ व त्याच्या मित्राला शेडमध्ये बोलावलं. त्यांना तिथे बोलावून उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी घडली.

Mumbai Crime News : एअर होस्टेस तरुणीची हत्या, पवईतील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, मंदामिरी येथील कोमुराजुला रामुलू अंगडी बाजार परिसरात राहतात. कोमुराजुलाची शेळी बेपत्ता झाल्यानंतर त्याला संशय आला आणि त्याने गुराखी किरण आणि त्याचा मित्र चिलुमुलाला आपल्या शेडमध्ये बोलावलं. येथे या तिघांनी दोघांनाही उलथापालथ करून बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्यांना आगीवर उलटं टांगूनही मारलं.

Valarmathi isro : चांद्रयान-3 मोहीम काउंटडाउन आवाज झाला शांत! वलरामथी यांचे निधन

विनवणी करत राहिले पण…

व्हिडीओमध्ये दोन्ही पीडित तरूण ओरडताना दिसत आहेत. दोघंही त्यांना सोडण्यासाठी विनवणी करत होते पण आरोपींनी त्यांना सोडलं नाही. यानंतर पीडित किरणच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली. तक्रारीनंतर, आरोपींविरूद्ध आयपीसी कलम-307 (हत्येचा प्रयत्न) आणि एससी/ एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

2 सप्टेंबर रोजी बेल्लमपल्लीचे एसीपी सदैया आणि एसएसआय चंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास केला. बेल्लमपल्ली एसीपी सदैया यांनी माहिती दिली की, घटनेनंतर त्यांनी तिन्ही आरोपी रामुलू, त्यांची पत्नी स्वरूपा आणि मुलगा श्रीनिवास यांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

Maratha Morcha : “हा जनरल डायर कोण?”, शिवसेनेचं (UBT) शिंदेंना चॅलेंज

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगरमधून असाच एक प्रकार उघडकीस आला होता . तेथेही चोरीच्या संशयावरून चार अनुसूचित जातीतील तरुणांना झाडाला उलटे टांगून काठ्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी चार पीडितांचं त्यांच्या घरातून अपहरण केलं होतं. आरोप आहे. या सर्वांना एवढी मारहाण करण्यात आली की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर पीडितांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    follow whatsapp