Thane Murder: गेल्या काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात (Thane) गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठाण्यात एकाची दारुसाठी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे शहरात एका व्यक्तीने 29 वर्षाच्या वेल्डर (Welder Murder) म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या (Murder) केली आहे. वेल्डरकडे दारुसाठी पैसे मागितल्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या चाकूने हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली आहे.(welder murder for liquor in Thane, stabbed him to death when he refused)
ADVERTISEMENT
आरोपीला भेटला अन् घात झाला
या घटनेची माहिती देता श्रीनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी सांगितले की, ही घटना रविवारी दुपारी घडली. वेल्डर दुपारच्या वेळी शौचालयाला जाण्यासाठी इस्टेटमधील राम नगर भागात ते घरातून बाहेर पडले होते. त्यावेळी वेल्डरची आणि आरोपीची गाठभेट झाली. ज्याने चाकूने भोसकून हत्या केली आहे. तो चालक असून त्याच परिसरात राहत होता.
हे ही वाचा >> UP पुन्हा हादरली, ट्रॉली बॅगमध्ये सापडले शरीराचे तुकडे, नेमकं प्रकरण काय?
दारुसाठी राग अनावर
वेल्डर आणि आरोपी चालक ज्या वेळी भटेले होते त्यावेळीही हल्ला करणारा दारुच्या नशेतच होता. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा दारुसाठी वेल्डरकडे पैसे मागितले. दारुसाठी पैसे देणार नाही असं म्हणताच, त्याने त्याच्या चाकूने हल्ला करुन वेल्डरची हत्या केली. चाकूने हल्ला करताच वेल्डरचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसही चक्रावले
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी आरोपीला आणि त्याच्याकडील चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतले असून कलम 302 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT