Actor Bhupendra : उत्तर प्रदेश पोलिसांनी अभिनेता भूपेंद्र सिंगला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. भूपेंद्र सिंगला हत्या केल्या प्रकरणी त्याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीची भूपेंद्रने हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तर यामध्ये आणखी दोघं जण जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात लक्ष न घातल्याने त्या पोलिसांना निलंबित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
बापलेकांवर केला गोळीबार
बिजनौरमधील कुआनखेडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी गुरदीप नावाच्या शेजाऱ्यासोबत अभिनेत्याचा वाद झाला होता. गुरदीप यांच्या शेतातील अभिनेता झाडं तोडत होता. त्यावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. गुरदीपने झाडं तोडण्यास विरोध केल्याने त्या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. वाद झाल्यानंतर अभिनेता भूपेंद्रने स्वतःकडे असलेली रिव्हॉल्व्हर काढून त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी त्या हल्ल्यात गुरदीप, त्यांची दोन मुलं यामध्ये जखमी झाली.
हे ही वाचा >> Nawab Malik : फडणवीसांचा लेटर बॉम्ब, अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
शेतात जाऊन दादागिरी
भूपेंद्रने केलेल्या गोळीबारात गुरदीप यांचा 23 वर्षाचा मुलगा गोविंद याचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या तिघांवर गोळीबार करून एकाला ठार व दोघांना जखमी केल्याप्रकरणी भूपेंद्रला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण होण्याआधीच गुरदीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी 19 नोव्हेंबर रोजी भूपेंद्रच्या विरोधात पोलिसांमध्ये एक तक्रार नोंदवली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की अभिनेता त्यांच्या शेतातील झाडे तोडत असूनही त्याच्यावर का कारवाई केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
भूपेंद्रच्या मालिका आणि चित्रपट
या वादाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी सुमित राठी यांनी इन्स्पेक्टर यासीन आणि कॉन्स्टेबल कृष्ण कुमार यांना निलंबित केले आहे.
अभिनेता भूपेंद्र हा गेल्या अनेक दिवसांपासून टीव्ही आणि चित्रपटातून काम करत आहे. भूपेंद्रला चांगले चित्रपट मिळाले नसले तरी त्याचे फॅन फॉलोइंग चांगली आहे. भूपेंद्रने ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’, ‘रिश्तों का चक्रव्यूह’, ‘तेरे शहर में’ आणि ‘एक हसीना थी’ या मालिकांमध्ये काम केले होते.
ADVERTISEMENT