UP Crime : रुग्णालयात बालकांची चोरी आणि बाळ पळवण्याच्या रॅकेटच्या वेगवेगळ्या घटना सांगितल्या जातात. मात्र उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये (Uttar Pradesh Balarampur) चालवल्या जाणाऱ्या बनावट हॉस्पिटलची गोष्ट ऐकून मात्र तुम्हाला धक्काच बसेल. कारण येथील रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली होती. प्रसूती झाल्यानंतर महिला शुद्धीवर आली तेव्हा तिला तुम्ही मृत नवजात बालकाला (Dead newborn baby) जन्म दिल्याचे सांगितले. मात्र त्या गोष्टीवर महिलेचा विश्वास बसला नाही, म्हणून तिने थेट डॉक्टराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
धक्कादायक गोष्टी आल्या समोर
रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी प्रथम डॉ. अकरम आणि डॉ. हफीजुर्रहमानला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी करायला सुरुवात केली. रुग्णालयाची पाहणी करताना मात्र पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या आहेत. त्यानंतर या रुग्णालयाची तक्रार आरोग्य विभागाकडेही करण्यात आली. त्यावेळी त्यांनीही हे रुग्णालय बनावट पद्धतीने चालवत असल्याची माहितीही त्यांना समजली आहे.
हे ही वाचा >> ‘दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी…’ ठाकरेंची Cm शिंदेंवर जोरदार टीका
मृत नवजात बालक
पोलिसांनी सांगितले की, गौरा चौराहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झौव्वा गावात राहणाऱ्या एका महिलेने 26 नोव्हेंबर रोजी पाचपेडवा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, तिची प्रसूती 29 ऑक्टोबर रोजी मिशन हॉस्पिटल आणि माता आणि बाल शस्त्रक्रिया केंद्र, पचवेदवा येथे झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिचे बाळ मृत झाल्याचे तिला सांगितले, मात्र तिचे ते नवजात बालक डॉक्टरांनी विकल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. त्यामुळे तिने थेट पोलिसात जात डॉक्टराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करताच अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
शुद्धीवर येताच बसला धक्का
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मिशन रुग्णालयाचा डॉ. हाफिजुर्रहमान याने तक्रारदार महिलेची प्रसूती केली होती. ज्यावेळी प्रसूतीसाठी महिलेला बेशुद्ध करण्यात आले होते. त्यावेळी नवजात बालक नगरसेवक निसार याच्याकडे देण्यात आले. त्यानंतर महिलेला शुद्ध आल्यानंतर तिचे बालक मृत असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. मात्र त्या गोष्टीवर तिचा विश्वास बसला नाही. त्यामुळे तिने थेट डॉक्टरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
रुग्णालय केले सील
प्रसूती करणारे डॉ. हाफिजुर्रहमान, त्याचा सहकारी आणि रुग्णालयाचे संचालक डॉ. अकरम जमाल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर बाळाला नगरसेवक निसारच्या घरातून ताब्यात घेतले आहे. मात्र या गुन्ह्यातील काही आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणामुळे आरोग्य विभागाकडून हे रुग्णालय आता सील करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT