पुणे : Pune Porsche Car Accident Updates : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजोबा आणि वडिलांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तसंच, अल्पवयीन मुलांना दारू दिल्याप्रकरणी बारचालकांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. या सगळ्यात आता घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शीही पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत दोन प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. (when pune porsche car accident happend-what accussed said at that time eyewitness tells incident)
ADVERTISEMENT
त्यापैकी अमीन शेख याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ज्यावेळी अल्पवयीन मुलाला तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मारहाण केली तेव्हा मुलगा ओरडत होता. 'तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या, मला मारहाण करू नका, मी पाहिजे तेवढे पैसे आत्ताच देईन.' असं तो वारंवार म्हणत असल्याचं अमीन शेखने सांगितलं.
हेही वाचा : MVA महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? सट्टा बाजाराचा मोठा अंदाज
अपघातस्थळावरील CCTV मध्ये प्रत्यक्षदर्शी अमीन शेखही दिसत आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय, की त्याने रस्ता ओलांडला आणि काही सेकंदात एक पोर्श कार त्याच्या मागून गेली आणि त्यानंतर अनिषच्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकीस्वार अनिष आणि त्याच्या मागे बसलेली अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावाने कारमध्ये उपस्थित असलेल्या मुलाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
'अल्पवयीन आरोपीच चालवत होता कार'
याआधी आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते की, 'अल्पवयीन आरोपीच कार चालवत होता. त्यांनी सांगितले की घटनेच्या दिवशी पोर्श कारचा वेग खूप जास्त होता. कारने मोटरसायकलला इतक्या जोरात धडक दिली की आम्हाला काहीच समजले नाही. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ती 10 फूट हवेत उडाली आणि खाली माझ्यासमोर पडली.'
हेही वाचा : BJP जिंकणार की नाही, सट्टा बाजाराने कोणाचं वाढवलं टेन्शन?
गाडीच्या सर्व एअरबॅग उघडल्यामुळे आरोपीला घटनास्थळावरून पळून जाण्याची संधी मिळाली नाही. कारमध्ये अल्पवयीन आरोपींशिवाय आणखी दोन ते तीन जण होते. एअरबॅग उघडल्यामुळे हे सर्व लोक कारमधून बाहेर आले, त्यानंतर जमावाने आरोपीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीला पकडले आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ADVERTISEMENT