Pune Acp Bharat Gaikwad: पुणे: महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड (Bharat Gaikwad) यांनी त्यांच्या पुण्याच्या (Pune) राहत्या घरी स्वत:च्या पत्नीची (Wife) आणि पुतण्याची (nephew) रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून हत्या (murder) केली. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या सगळ्या प्रकाराला चार दिवस झालेले असतानाही या घटनेमागचं रहस्य कायम आहे. (why did pune acp bharat gaikwad murder of wife and his nephew know inside story crime news)
ADVERTISEMENT
या दुहेरी हत्या आणि आत्महत्येच्या प्रकरणात स्वत: भरत गायकवाड हे आरोपी आहेत. पण आता तेच ह्यात नसल्याने या पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी, खरं कारण शोधणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
Pune Bharat Gaikwad: हत्या, आत्महत्येची Inside Story
पुणे पोलीस आणि अमरावती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ACP भरत गायकवाड हे 57 वर्षांचे, मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. तिथेच त्यांचं शिक्षण झालं. पुढे MPSC परीक्षा पास करून 1988-89 साली ते महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. त्यांचं पहिलं पोस्टिंग हे मुंबईत PSI म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून झालं.
पुढील अनेक वर्ष ते मुंबई पोलीस दलात ते कार्यरत होते. स्वत:च्या कर्तृत्वावर मुंबईतील डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली.
पोलिसांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार, 2021 सालापासून ते महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावतीमध्ये ते ACP म्हणून नियुक्त झाले होते. तेव्हापासून ते तिथेच नोकरी करत होते. त्यांचा स्वभाव हा मनमिळाऊ असा असल्याने पोलीस स्टेशनमधील सहकाऱ्यांसह नागरिकांमध्येही त्यांची ख्याती होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत गायकवाड यांनी जवळपास 8 दिवसांची सुट्टी त्यांनी मंजूर करून घेतली होती. त्यानंतर ही सुट्टी घालविण्यासाठी ते पुण्यात आपल्या घरी आले होते. पण याच सुट्टीत ही अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली.
हे ही वाचा >> गळा आवळून हत्या केली, नंतर कपडे उतरवून…; भावाने बहिणीसोबत केलेल्या कृत्याने सगळेच हादरले
याबाबत गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी जी माहिती पोलिसांनी दिली ती अशी की, घटनेच्या दिवशी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास जेव्हा सगळीकडे शांतता होती त्यावेळेस अचानक भरत गायकवाड यांच्या बेडरूममधून मोठमोठ्याने पहिल्यांदा भांडणाचा आवाज आला. नंतर जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. यानंतर काही क्षणातच गोळ्या झाडण्याचा आवाज आला.
गोळ्यांचा आवाज आल्याने घरच्या सगळ्या सदस्यांनी म्हणजे दोन मुलं, पुतण्या आणि भरत गायकवाड यांची आई हे त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ गेले आणि जोरजोरात दरवाजा ठोठवण्यास सुरुवात केली.
दरवाजा उघडण्याची त्यांनी विनंतीही केली. पण आतून काहीही आवाज येत नव्हता म्हणून दुसऱ्या चावीने पुतण्या दीपक गायकवाड याने दरवाजा उघडला.. त्याने आत डोकावून पाहताच पुन्हा एकदा गोळीबार झाला. यामध्ये अॅड. दीपक गायकवाड गंभीररित्या जखमी झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा देखील जागीच प्राण गेला.
हे ही वाचा >> Crime : वहिनी किचनमध्ये गेली अन् दिराने दरवाजा लावला, घडलं भयंकर कांड
त्यानंतर ACP भरत गायकवाड यांच्या मोठ्या मुलाने बेडरुममध्ये जाऊन त्यांच्या हातातील बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला देखील भरत गायकवाड यांनी धमकावलं.. जर तू इथून गेला नाहीस तर तुझ्यावर पण गोळी झाडेल असं म्हणत त्याला देखील खोलीतून बाहेर ढकललं आणि दरवाजा बंद करून घेतला.
काही क्षणात पुन्हा एकदा फायरिंगचा आवाज आला आणि सर्व काही शांत झालं. घरच्या लोकांनी पुन्हा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा त्यांना दोन व्यक्ती म्हणजे भरत गायकवाड आणि त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे दोघेही तिथे मृतावस्थेतच होते.
हा सर्व प्रकार गायकवाड कुटुंबीयांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात कळवला. ज्यानंतर आता पोलिसांचा तपास सुरू झाला. पण सध्या या पूर्ण प्रकरणाचा छडा लावणं हे मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे.
ADVERTISEMENT